धुळ्य़ात मद्यविक्री विरोधात उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना घेराव
By Admin | Published: June 15, 2017 01:02 PM2017-06-15T13:02:47+5:302017-06-15T13:02:47+5:30
मद्यविक्रीचे दुकान बंद किंवा स्थलांतरीत करण्यात यावे, यासाठी प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांसह परिसरातील नागरिकांनी आंदोलन केल़े
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 15 - शहरातील प्रमोदनगर सेक्टर 2 मध्ये सुरू असलेले मद्यविक्रीचे दुकान बंद किंवा स्थलांतरीत करण्यात यावे, यासाठी प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांसह परिसरातील नागरिकांनी आंदोलन केल़े यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांना घेराव घालण्यात आला तसेच भजनही करण्यात आल़े
शहरातील प्रमोदनगर सेक्टर 2 मध्ये एका रहिवासी घरात वाइन शॉप सुरू करण्याच्या हालचाली काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या़ मात्र, सदरचा प्रकार लक्षात येताच प्रभागाचे नगरसेवक कमलेश देवरे व वैभवी दुसाणे यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने या वाइन शॉपला जोरदार विरोध करीत 9 जूनला आंदोलन केले होते, तसेच जिल्हाधिका:यांना निवेदन दिले होत़े प्रस्तावित वाइन शॉपलगत सुरू असलेले मद्यविक्रीचे दुकान देखील तत्काळ बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली़
दरम्यान, मद्यविक्री दुकानांना विरोध करीत मंगळवारी आंदोलन झाले होत़े त्यानंतर बुधवारी सायंकाळी 7 वाजता पुन्हा एकदा याठिकाणी आंदोलन करण्यात आल़े परिसरातील नागरिक व महिलांनी मद्यविक्री दुकानाच्या ओटय़ावर भजन आंदोलन केल़े तसेच संबंधित मद्याचे दुकानाला विरोध केला़ आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंचुळे हे त्याठिकाणी आले असता महिला व परिसरातील नागरिकांनी त्यांना घेराव घातला़
प्रमोद नगरातील दोन्ही मद्यविक्री दुकानांचे परवाने रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली़ यावेळी नगरसेवक कमलेश देवरे यांनी मद्यविक्रीच्या दुकानांना विरोध केला़ ‘जर संबंधित दुकाने तत्काळ बंद किंवा स्थलांतरीत केली नाही तर आम्हा नगरसेवकांना व परिसरातील नागरिकांना देखील मद्यविक्रीचे परवाने द्यावेत, संपूर्ण प्रमोदनगरात दारूगल्ली करू, अशा शब्दात कमलेश देवरे यांनी नाराजी व्यक्त केली़
नगरसेविका वैभवी दुसाने यांनीदेखील अंचुळे यांना जाब विचारत वाइन शॉप टाकण्याचा प्रयत्न झालेले निवासी घर त्यांना दाखविल़े