प्रवाशांच्या संख्येवर बस फेऱ्या अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 10:25 PM2020-08-19T22:25:32+5:302020-08-19T22:26:11+5:30

आंतरजिल्हा बससेवा सुरू : धुळे आगारातून नाशिक, औरंगाबाद, जळगाव, चोपडासाठी बससे सोडणार

Depending on the number of passengers | प्रवाशांच्या संख्येवर बस फेऱ्या अवलंबून

प्रवाशांच्या संख्येवर बस फेऱ्या अवलंबून

Next

धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल साडेचार महिन्यानंतर आंतरजिल्हा बससेवा २० आॅगस्ट पासून सुरू होणार आहे. मात्र ही सेवा टप्प्या-टप्याने सुरू होणार असून, प्रवाशांच्या प्रतिसादावरच बस फेऱ्यांची संख्या अवलंबून राहणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून संपूर्ण भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बससेवा तेव्हापासून बंद होती. आगारातील कर्मचारीही घरीच होते. मध्यंतरी धुळे आगाराच्या बसेसने कोटा (राजस्थान) येथील विद्यार्थ्यांना राज्याच्या वेगवेगळ्या भागात पोहचविले होते. त्यानंतर परप्रांतीय मजुरांना सीमेपर्यंत पोहचविण्यासाठी एस.टी.ची मोफत सेवा सुरू करण्यात आली होती.
दरम्यान लॉकडाउनच्या चौथ्या टप्यात शासन निर्देशानुसार रेड झोन व नॉन रेडझोन असे दोन टप्पे करण्यात आले होते. त्यानुसार नॉनरेड झोनमध्ये २२ मे २०२०पासून बससेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला होता. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, व साक्री हे आगार नॉन रेड झोनमध्ये असल्याने या आगारातून जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली होती. मात्र धुळे महापालिका क्षेत्र ‘रेड झोन’मध्ये असल्याने, धुळे मध्यवर्ती बसस्थानकातून बससेवा सुरू झालेली नव्हती. जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली तरी त्याला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रवाशांअभावी बसेस या आगारात उभ्या होत्या. पुरेशा प्रमाणात प्रवाशी मिळत नसल्याने, काही आगारांनी या फेºयाही रद्द केल्या होत्या. दरम्यान एस.टी.चे आर्थिक उत्पन्नच थकल्याने, त्याचा परिणाम कर्मचाºयांच्या पगारावर झालेला होता. काही कर्मचाºयांनी तर उदरनिर्वाहासाठी दुसरा व्यवसाय सुरू केले होते. दरम्यान गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असतांना राज्य सरकारने आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊन गणेशभक्तांबरोबरच प्रवाशांनाही सुखद धक्का दिला आहे. शासन निर्देशानुसार ५० टक्के प्रवाशी वाहतुकीप्रमाणे एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशी बसविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. बस स्थानकातून निघण्यापूर्वी सॅनिटराईज करण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार असली तरी पूर्वीप्रमाणे एकदम बससेस सुरू करण्यात येणार नाहीत. टप्या-टप्प्याने बसेस सोडण्यात येणार आहेत. जोपर्यंत प्रवाशांची संख्या १५ होत नाही तोपर्यंत आगारातून बस सोडण्यात येणार नाही. गुरूवारी धुळे मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिक, औरंगाबाद, जळगाव, व चोपडा या चार मार्गांवर बसेस सोडण्यात येतील. साधारणत: सकाळी ८.३० वाजेपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. जेवढ्या बसगाड्या सोडण्यात येतील तेवढेच चालक व वाहक यांना बोलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बसेसची तपासणी
दरम्यान धुळे आगारातील बसेस साडेचार महिन्यापासून जागेवरच उभ्या होत्या. गुरूवारपासून बससेवा सुरू होणार असल्याने, त्या सुरू होतात की नाही याची तांत्रिक विभागाकडून तपासणी करण्यात येत होती.
आंतरजिल्हा बससेवा गुरूवारपासून सुरू होत आहे. टप्या-टप्याने बसेस सोडण्यात येतील. प्रवाशांची मागणीवर फेºया अवलंबून राहणार आहे. -पी. डी. देवरे, विभागीय वाहतूक नियंत्रक,धुळे

Web Title: Depending on the number of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे