कोविडसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मानधनाचा धनादेश जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:37 PM2020-08-22T22:37:35+5:302020-08-22T22:38:01+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द । जि.प.सदस्य संग्राम पाटील यांचा उपक्रम
धुळे : मुख्यमंत्री सहायता निधीत कोविड रुग्णांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी धनादेशाचा दुसरा हप्ता जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे सुपुर्द केला़ जिल्हाधिकारी यांनी देखील हा धनादेश स्विकारुन शासनाकडे पाठविला़
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने पुढे सरसावत आहे़ जिल्हा परिषदेच्या कुसुंबा गटाचे सदस्य संग्राम पाटील यांनी आपल्याला मिळणारे मानधन, सभेचे भत्ते हे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकामी अर्थसहाय्य म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात यावे असे पत्र पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीय यांना १० एप्रिल रोजी दिले होते़ त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मधून मिळणाºया १२ हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे संग्राम पाटील यांनी सुपुर्द केला़ तसेच जिल्हा परिषदमधून मिळणारे मानधन, भत्ते जसंजसे माझ्या खात्यावर जमा होतील तसतसे अडीच वर्षापर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले़