‘हॉकर्स झोन’बाबत प्रशासनात उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:48 PM2019-02-25T22:48:39+5:302019-02-25T22:49:04+5:30

महापालिका : जागाच मिळेना; शहरात विविध १२ मार्गांवर ७३९ हॉकर्सधारकांचा व्यवसाय 

Depression in the administration of 'Hawker's Zone' | ‘हॉकर्स झोन’बाबत प्रशासनात उदासिनता

‘हॉकर्स झोन’बाबत प्रशासनात उदासिनता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  शहरातील हॉकर्समुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी विशिष्ठ ठिकाणी झोन तयार करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला़ यासंदर्भात बैठका देखील घेण्यात आल्या़ मात्र, प्रशासकीय दुर्लक्षामुळे हा प्रश्न आजही प्रलंबित आहे़ हा प्रश्न सुटल्यास आग्रा रोड मोकळा श्वास निश्चित घेऊ शकेल़ हे माहित असून देखील याकडे गांभिर्याने प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही़  
महानगर पालिका क्षेत्राकडील नगरपथ विक्रेता समिती गठीत करण्यात आली़ शहरातील फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्र ठरविण्याबाबत उपसमिती नेमण्यात आली़ उपसमितीने सादर केलेल्या अहवालावर ७ मार्च २०१८ रोजी बैठक घेण्यात आली होती़ बैठकीत झालेली चर्चा आणि अहवाल हा महासभेपुढे सादर करण्यात आला होता़ महासभेत यावर चर्चा झाली आणि त्यात काही बदल सुचवून महासभेने मान्यता देखील दिली़ त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्याबाबत नगरपथ विक्रेता समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दालनात ४ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती़ 
सुमारे ७३९ हॉकर्सधारक
प्राथमिक स्तरावर भंगार विक्रेते ११, भाजीपाला विक्रेते १९२, कटलरी व खेळणी विक्रेते ४८, चहा-नास्ता, ड्रायफूट विक्रेते १३०, कपडे, बॅग ४८, पादत्राणे २२, चष्मे, बांगडी ७३, पूजा ३, मसाले ५, गॅरेज व इतर असे ७३९ जवळपास हॉकर्सधारकांचा नियमित व्यवसाय सुरु असल्याचे महापालिकेच्या प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे़ 
व्यवसायासाठी या जागा
पाट बाजार ते आपला महाराष्ट्र कार्यालयपर्यंत या ठिकाणी त्याच परिसरातील व नगरपट्टी परिसरातील फेरीवाला करीता जागा असेल़ गणपती मंदिर पुलाजवळील मोराणकर यांच्या घराजवळील फेरीवाल्यांकरीता देवपूर भागातील यशोदा कांडप केंद्रासमोरील जागा असेल़ जेल समोरील रस्ता क्युमाईन क्लब ते जेलपर्यंत या ठिकाणी सर्व प्रकारची कटलरी, खेळणी, कपडे, बॅग, पादत्राणे, काचेच्या वस्तू, फरसाण विक्रेत्यांकरीता जागा असणार आहे़ तसेच जे़ बी़ रोड कोपरा ते टॉवर गार्डन पर्यंतचा रस्ता भाजीपाला विक्रेत्यांकरीता असेल़ भंगार विक्रेत्यांकरीता महापालिका शाळा क्रमांक २५ समोरील जागा असणार आहे़ पाच कंदिल जवळील आग्रा रोड ते ऊस गल्ली पावेतो डाळ्या, मुरमुरे, फुटाणे विकण्याकरीता जागा असणार आहे़ श्रीराम पेट्रोल पंप ते पाण्याच्या टाकीजवळील जागा ही गॅरेज करीता राहील़ सावता माळी मार्केट या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांसाठी असणार आहे़ दरम्यान, हा प्रश्न रखडलेला असून उपाययोजना करण्याची गरज आहे़ 
या ठिकाणी हॉकर्सला मज्जाव
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते महात्मा गांधींचा पुतळा (संपुर्ण आग्रा रोड), गल्ली नंबर २ गोल बिल्डींग ते नवग्रही पर्यंतचा रस्ता, झाशी राणी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (पारोळा रोड रस्ता), गल्ली नंबर १ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजवाडे बँक चौक पर्यंतचा रस्ता, जयहिंद विद्यालय ते जयहिंद महाविद्यालय पर्यंतचा रस्ता, देवपुरातील गणपती मंदिर पुल जवळील मोराणकर यांच्या घराजवळील परिसर असे एकूण ७ ठिकाणी ‘नो-हॉकर्स’ झोनची निश्चिती करण्यात आलेली आहे़ 

Web Title: Depression in the administration of 'Hawker's Zone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे