देशी दारूचा कारखाना उदध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:16 PM2019-10-05T23:16:04+5:302019-10-05T23:16:52+5:30

सहा लाखांचा मुद्देमाल जप्त । एकाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल

Destruction of indigenous liquor factory | देशी दारूचा कारखाना उदध्वस्त

dhule

Next


शिरपूर : तालुक्यातील कनगई येथे एका घरात सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उदध्वस्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली.
या संदर्भात गुप्त माहिती कळताच कनगई येथील भिका तुकाराम भिल याच्या राहत्या घरावर छापा मारण्यात आला. त्यावेळी तेथे देशी दारू प्रिन्स संत्राचे १८० मिलीचे एकूण ११६ खोके व २०० लिटरचा प्लॅस्टिक ड्रम पूर्णपणे स्पिरीटने भरलेला, तसेच ३५ लिटर क्षमतेचे ५ प्लॅस्टिक ड्रम पूर्ण स्पिरीटने भरलेले असे एकूण ३७५ लिटर स्पिरीट, एक सिलींग मशिन, २० हजार देशी दारू प्रिन्सचे लेबल व इतर साहित्य मिळून आले. या एकत्रित मुद्देमालाची किंमत ६ लाख २ हजार ६४४ रुपये एवढी आहे.या प्रकरणी भिका भिल याच्याविरूद्ध मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक अंकुश सूर्यवंशी, शिरपूर, बी.एस. महाडिक, धुळे, डी.के. मेंगाळ, भरारी पथकाचे प्र.निरीक्षक बी.आर. नवले, धुळे, आर.एम. फुलझळके, नाशिक, एम.पी. पवार, शिरपूर, एन.एस. गायकवाड, हाडाखेड, के.एन. गायकवाड, साक्री, एन.एस. गोवेकर, अनिल निकुंभे, एस.पी. कुटे, शांतीलाल देवरे, गोरख पाटील, भालचंद्र वाघ, केतन जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास दुय्यम निरीक्षक एम.पी. पवार करीत आहेत.

Web Title: Destruction of indigenous liquor factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे