ग्रामसभांची माहिती जिल्हा परिषदेत वेळेवर पोहचेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 01:45 PM2017-05-14T13:45:29+5:302017-05-14T13:45:29+5:30
सभा झाल्या की नाही याचीच माहिती पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेत वेळेवर प्राप्त होत नसल्याचे समोर आलेले आह़े
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 14 - विशिष्ठ दिवशी ग्रामसभा घेणे, चर्चा करून आढावा सादर करण्याच्या सूचना शासनाकडून वेळोवेळी देण्यात येतात़ मात्र, सभा झाल्या की नाही याचीच माहिती पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषदेत वेळेवर प्राप्त होत नसल्याचे समोर आलेले आह़े यासाठी वेळोवेळी सूचना देऊनही त्याचा काहीही उपयोग होत नाही़ 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभांची ग्रामपंचायतनिहाय माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही़
ग्रामीण भागात ग्रामस्थांना शासनाच्या कोणत्या योजना सुरू आहेत, त्या योजनेचा लाभ आपल्या गावातील किती ग्रामस्थांना घेता येऊ शकतो, गावात कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे, यासह आनुषंगिक बाबी ग्रामसभेच्या माध्यमातून सांगितल्या जात असतात़ यासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक आह़े ग्रामस्थांना विशेष अधिकारदेखील वापरता येतो़
माहितीचा अभाव
शासनाच्या धोरणानुसार विशिष्ट दिवशी या ग्रामसभा घेण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आह़े त्यानुसार ग्रामसभा झाल्या का? झाल्या असल्यास त्याची माहिती पंचायत समितीर्पयत पोहचण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची आह़े मात्र 1 मेच्या ग्रामसभेला तब्बल 13 दिवस होऊनदेखील जिल्ह्यातील 551 ग्रामपंचायतींपैकी किती ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्या आहेत, त्याची माहिती अद्यापर्पयत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागार्पयत आलेली नाही़ पंचायत स्तरावर वारंवार मागणी करूनही त्याकडे गट विकास अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे यातून समोर आलेले आह़े त्यामुळे जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा झाल्या याची स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलेले आह़े
दरम्यान, ग्रामपंचायतींनी ग्रामसभांची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़
अहवाल बंधनकारक
ग्रामीण भागात ग्रामसभा घेतल्या गेल्यानंतर त्यांचा अहवाल हा पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे लवकरात लवकर सादर केल्यानंतर त्या सभांची माहिती संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक आह़े मात्र असे होत नाही़ आजवर झालेल्या विविध ग्रामसभांच्या माहितीची उदासीनता आजही कायम आह़े
शासनाने ठरवून दिलेल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेणे आणि त्याचा अहवाल पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे पाठविणे बंधनकारक आह़े तालुक्यातील चारही गट विकास अधिका:यांनी 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभेचा अहवाल तातडीने पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत़ लवकरात लवकर अहवाल सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल़
- ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी