नो पार्कींगमध्ये वाहनांच्या रांगा लागल्याने खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:44 PM2020-05-21T20:44:48+5:302020-05-21T20:45:07+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : पालकमंत्र्यांच्या आगमनामुळे गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नो पार्कींक झोनमध्ये वाहनांच्या रांगा लागल्याने खोळंबा झाला होता़
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून मुख्य इमारतीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर झाडांची सावली असल्याने याठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहने लावण्याचा प्रकार सातत्याने घडत होता़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांच्या वाहने जाण्यासही अडचण निर्माण झाली होती़
या समस्येवर उपाय म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी नो पार्कींक झोनजवळ पूर्णवेळ कामगाराची नियुक्ती करुन नो पार्कींमध्ये वाहने लावण्याचा बेशिस्त प्रकार थांबविला होता़
गंगाथरण डी यांची बदली झाल्यानंतर नवीन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी पदभार घेतला़ परंतु लॉकडाउनमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वर्दळ कमी झाल्याने पार्कींगची समस्या नव्हती़ परंतु बाहेरगावी जाण्यासाठी पासेस देण्याचे काम प्रशासनाने सुरु केल्यापासुन नो पार्कींगमध्ये वाहने लावण्याची समस्या पुन्हा उद्भवली आहे़ गुरुवारी पालकमंत्र्यांच्या आगमनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती़ कार्यकर्त्यांसह, कर्मचारी, पोलीस यांच्या दुचाकी आणि पुढाºयांची चारचाकी वाहने देखील नो पार्कींगमध्ये होती़