अनिष्ठ प्रथांना फाटा देण्याचा आदिवासी कोकणी समाज मेळाव्यात निर्धार

By admin | Published: April 29, 2017 05:45 PM2017-04-29T17:45:56+5:302017-04-29T17:45:56+5:30

आदिवासी संस्कृतीचा एक मोठा इतिहास आहे. मात्र आदिवासी समाजात अनिष्ठ प्रथा व अंधश्रद्धा यामुळे हा समाज मागे पडत आहे.

Determination in the tribal Konkan Samaj Melava to break into untrained practices | अनिष्ठ प्रथांना फाटा देण्याचा आदिवासी कोकणी समाज मेळाव्यात निर्धार

अनिष्ठ प्रथांना फाटा देण्याचा आदिवासी कोकणी समाज मेळाव्यात निर्धार

Next

ऑनलाइन लोकमत

पिंपळनेर, जि. धुळे, दि. 29 -  आदिवासी संस्कृतीचा एक मोठा इतिहास आहे. मात्र आदिवासी समाजात अनिष्ठ प्रथा व अंधश्रद्धा यामुळे हा समाज मागे पडत आहे. समाजाची प्रगती साधायची असेल, तर अनिष्ठ प्रथा, रुढी व परंपरा यांना फाटा देऊन समाजातील तरुणांनी शिक्षणाची कास धरावी, असा सल्ला माजी खासदार बापू हरि चौरे यांनी दिला.  दरम्यान, 9 मे रोजी रोहोड (ता. साक्री) येथे पुन्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
साक्री तालुक्यातील कुडाशी येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आदिवासी कोकणी समाजाचा पहिला मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अनिष्ट प्रथांना फाटा देण्याचा निर्धार करण्यात आला. मेळाव्यापूर्वी कुडाशी गावातून रॅली काढण्यात आली. 
कोकणी समाज हा आदिवासी संस्कृतीचा कणा आहे. समजाने शिक्षणातून विकास साधण्याची गरज आहे. मुला, मुलींना उच्च शिक्षित केले पाहिजे. समाजात असलेल्या अनिष्ठ प्रथा घालवून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या समाजाचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे जी. आर. कोकणी यांनी सांगितले.
आमदार डी. एस. अहिरे म्हणाले, की आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा असेल, तर त्यांच्यात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. परंतु, या योजनांबाबत त्यांना माहिती नसल्यामुळे शासकीय योजनांचा फायदा आदिवासी बांधवांना घेता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मेळाव्यात घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय
विवाहावर अव्वाचा सव्वा खर्च न करता कमी खर्च करावा, समाजात नव्या प्रथा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, समाजात शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रय}शील रहावे, समाजबांधवांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊच नये, आरोग्य बिघडल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, समाजातील बांधवांनी कायदा हातात घेऊ नये. तसेच तरुणांनी व्यसनांपासून दूर रहावे, असे निर्णय घेण्यात आले. 
संघटनेच्या माध्यमातून संस्कृती टिकविण्याचे प्रय}
कुडाशी गावात आदिवासी कोकणी समाज संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात 10 ते 15 मुलांची संघटना तयार करून समाजातील निर्माण होणारे प्रश्न व तरुणींवर अत्याचार झाला तर या संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना काम करेल, असे सांगण्यात आले. तसेच समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा घालविण्यासाठी या संघटनेतील पदाधिकारी काम करणार असून आदिवासी संस्कृती टिकविण्यासाठी प्रय} केले जाणार आहे. सूत्रसंचालन टी. डी. बहिरम यांनी केले.

Web Title: Determination in the tribal Konkan Samaj Melava to break into untrained practices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.