क्रांती स्मारकच्या विकास कामाला लवकरच सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:11 PM2019-01-01T22:11:35+5:302019-01-01T22:11:55+5:30
शिंदखेडा तालुका : क्रांति स्मारक संशोधन व जीर्णोद्धार समितीच्या बैठकीतील निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : साळवे फाटा येथील क्रांति स्मारकच्या विकास कामाला गती देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या क्रांतीस्मारक संशोधन व जीर्णोद्धार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठक माजी आमदार बापूसाहेब रावल यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दोंडाईचा येथील फार्महाऊस वर संपन्न झाली. क्रांती स्मारकाचा विकास दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत सर्व सदस्यांना देण्यात आली. यासाठी स्मारक समितीचे जनक व क्रांती स्मारक समितीचे अध्यक्ष बापूसाहेब रावल यांनी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सुमारे चाळीस वषार्पूर्वी निर्माण केलेल्या स्मारकाचे वास्तु तज्ञ अरविंद बागुल यांनी स्मारक निर्मिती मागील कल्पना व त्यातील प्रतिकात्मक बाबींचा ऊहापोह केला.सध्या मंजूर कार्यादेश नुसार पहिल्या टप्प्यात स्मारकाच्या सभोवतालीचे पेवर ब्लॉक बसवणे, सुशोभीकरण, संरक्षण कुंपण, १८०० चौरस फुटचे प्रदर्शनी दालन हे मंजूर आहे. या कामांचे लवकरच त्याचे भूमिपूजन करण्याचा निर्णय झाला.
यावेळी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब रावल, डॉ रवींद्रनाथ टोणगावकर, अविनाश पाटील, तुषार रंधे, निखिल सूर्यवंशी, जगदीश देवपूरकर, सत्तरसिंग गिरासे रूप सिंग गिरासे, रघुनाथ पाटील, नरेंद्र गिरासे, शासकीय प्रतिनिधी म्हणून अप्पर तहसीलदार उल्हास देवरे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम शामकांत भोसले, सुशांत पाटील, नाशिक अभियंता हेमंत गोसावी, उदय वाघ, निमंत्रित सदस्य अनिल पाटील शिरपूर, प्राध्यापक प्रा परेश शाह, भिका पाटील उपस्थित होते.
दुसऱ्या टप्यातील काम
दुसºया टप्प्यात कोणती विकास कामे अपेक्षित आहेत यावर चर्चा होऊन सर्वप्रथम पर्यटकांना आकर्षण वाटेल असेच स्मारक शिल्पाचे आधुनिकीकरण वृक्षसंवर्धन व बगीचा हिरवळ, पर्यटकांच्या निवास मुक्कामाची व्यवस्था,सोबत पाणी, वीज, सौर ऊर्जा, आणि कायमस्वरुपी देखभालीची व्यवस्था अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.