देवेंद्र फडणवीस यांनी दिले २५० पीपीइ किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 09:09 PM2020-04-23T21:09:17+5:302020-04-23T21:10:25+5:30
डॉक्टरांचे संरक्षण : हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला १०० तर महानगरपालिकेला ५० किट
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धुळे शहराला २५० पीपीइ किटचा पुरवठा केला आहे़ यासाठी भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल आणि डॉ़ रानडे यांनी पाठपुरवा केला होता़
कोरोना रुग्णांवर उपचार करणारे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला १०० किट देण्यात आले आहेत़ पन्नास किट धुळे महानगरपालिकेला तर उर्वरीत १०० किट कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार आहेत़
खासदार सुभाष भामरे, भाजप महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉ़ रानडे यांनी ५० किट गुरूवारी महापालिकेला सुपूर्द केले़ याबद्दल महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पदाधिकाºयांचे आभार मानले आहेत़ यावेळी उपमहापौर कल्याणी अंपळकर, डॉ़ रानडे दाम्पत्य, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, भिकन वराडे, उपायुक्त गणेश गिरी आदी उपस्थित होते़
दरम्यान, डॉ़ रानडे यांनी सर्वोपचार रुग्णालयाला देखील १०० किट नुकतेच सुपूर्द केले़
कोरोनाच्या जागतिक आपत्तीच्या काळात भारतीय जनता पार्टीतर्फे सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत़ लॉकडाउन काळापासुन दररोज २२ हजार गरजू नागरीकांना दोन वेळचे जेवण घरपाचे दिले जात आहे़ डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाºयांना संरक्षणाचे साहित्य वाटप केले जात आहे़ भाजप पदाधिकाºयांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे़