भक्तनिवास, हॉटेल्स, खानावळीत साचली धूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 09:52 PM2020-08-29T21:52:04+5:302020-08-29T21:52:57+5:30
भाविकांना हुरहूर । मंदिरे उघडण्याची मागणी
बळसाणे : येथील जैन मंदिर उघडण्यास साधारणपणे सहा महिने झाले़ गावातील शितलनाथ संस्थानाचे व विश्वकल्याणकातील विमलनाथाचे मंदीर बंद आहे़ राज्यासह भारतभरातील कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येणाºया भक्तगणांचा लोंढा कोरोनाच्या महामारीमुळे थांबला आहे़ यामुळे भाविकांना दर्शनाची हुरहूर लागून राहिली आहे़ भाविकांच्या सोयीसाठी असणारे भोजनालय, हाँटेल्स, पुस्तकालय बंद असल्यामुळे सर्व धर्मांचीच मंदिरे खुली करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे़
बळसाणे गावातील जैन मंदिर बंद असल्यामुळे शितलनाथ संस्थानचे व विश्वकल्याणक तीर्थाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़ एकुणच बळसाणे वासियांवर आलेले सर्व संकट दुर होण्यासाठी शासनाने मंदिर उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे़
तेरावे तीर्थंकर विमलनाथ भगवान, गुरु मंदिर, श्रीराम मंदिर, सप्तशृंगी मातेचे मंदिर, प्रतिपंढरपूर, गणेशाचे मंदिर, कानुबाई मातेचे मंदिर, शिव शंकराचे मंदिर, हनुमानाचे मंदिर, जीनमाता मंदिर, दिमाय मंदिर अशा विविध ठिकाणी दर्शनासाठी दर महिन्याच्या पौर्णिमेला व अमावस्येला, दिवाळी, उन्हाळी सुट्टी अशा विविध दिनी हजारो विमलनाथाचे भक्त दर्शनासाठी येतात़ यातूनच मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते़ ती थांबल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून गरजूंचा रोजगार देखील बंद पडला आहे़ गावातील जैन धर्मशाळा, विश्वकल्याणक, नुतन जैन धर्मशाळा, पौर्णिमा बेन धर्मशाळा बंद आहेत़ पुजा साहित्य, प्रसादालय, हार, रिक्षा, हाँटेल्स आदींचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे़
गेल्या ३२ वर्षात ही अशी महाभयानक परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही़ पैसे उसनवारी घेऊन जैन मंदिर परिसरात व्यवसाय उभा केला़ मात्र कोरोनामुळे सर्व नियोजन धुळीस मिळाले आहे़ गावातील अनेकांचा रोजगार बुडाला आहे़ आर्थिक उलाढाल पुर्णत: ठप्प झाली आहे़