खोदलेल्या रस्त्यांमुळे देवपूरकर वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 10:35 PM2021-01-24T22:35:17+5:302021-01-24T22:35:48+5:30
महापालिका व ठेकेदारामध्ये समन्वयाचा अभावामुळे नागरिकांना सहन करावा लागतोय अडचणी सामना
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपूर भागातील बहूसंख्य रस्ते जलवाहिनी व भूमिगत गटारीच्या कामासाठी खेादण्यात आले आहेत. या खोदलेल्या रस्त्यामुळे देवपूरकर वैतागले आहेत. हे रस्ते त्वरित दुरूस्त करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
शहरातील भुमिगत गटारी तसेच पाईप लाइन टाकण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्यासाठी काॅलनी भागातील व मुख्य रस्ते खोदण्यात येत आहे. रस्ते खोदण्यापुर्वी आधिचे रस्ते दुरूस्ती करून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची गरज असतांना मनपा व ठेकेदाराकडून असे कोणतेही नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे आग्रारोड, देवपूर दत्तमंदिर, जीटीपी स्टाॅप अशी भागातील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
काॅलनी भागात रस्ते खराब
देवपूरातील शाहू नगर, इंदिरा गार्डन भागातील रस्त्यावर माती चिखल असल्याने दुचाकी चालकांना अपघाता सामोरे जावे लागत आहे. जानकी नगर, चंद्रदिप नगर भागात गटारीचे काम पुर्ण झाले आहेे. रस्ता खडीने बुजण्यात देखील आला आहे. मात्र पाच महिन्यापासुन डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे.