धुळेनजिक तळघरात लपून ठेवला ९ लाखांचा कोरडा भांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:45 PM2019-03-02T22:45:07+5:302019-03-02T22:45:40+5:30

स्थानिक गुन्हे शाखा : वाहनांसह ११ लाखांचा मुद्देमाल, १ ताब्यात, १ फरार

Dhalnika's hidden cannabis hidden in the basement of 9 lakhs | धुळेनजिक तळघरात लपून ठेवला ९ लाखांचा कोरडा भांग

धुळेनजिक तळघरात लपून ठेवला ९ लाखांचा कोरडा भांग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नगाव बुद्रुक शिवारातील एका शेतजमिनीत तळघर करुन त्यात ठेवण्यात आलेला ९ लाख २० हजार ८०० रुपये किंमतीच्या १८० कोरड्या भांगच्या गोण्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या़ याप्रकरणी दोघांविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यातील एक ताब्यात आहे़ 
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कोरडा भांग एका शेतजमिनीत तळघर करुन त्यात लपवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार नगाव बुद्रुक शिवारातील राजेंद्र नारायण राणा (दाळवाले) याच्या साडेचार एकर बिन शेतजमिनीत मयूर नारायण राणा याने या शेतात जमिनीत ८ फुट खोल सिमेंटच्या ओतीव भिंतीच्या खाली तळ घर तयार केले होते़ त्यात कोरडा भांग विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवला होता़ या खोलीत १८० कोरड्या भांगच्या गोण्या त्यात सुमारे ४ हजार ६०४ किलो भांग मिळून आला़ त्याची किंमत ९ लाख २० हजार ८०० रुपये इतकी आहे़ याशिवाय या ठिकाणी दोन कारही मिळून आल्या़ त्याची किंमत २ लाख इतकी आहे़ असे एकूण वाहनांसह ११ लाख २० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला़ याप्रकरणी राजेंद्र नारायण राणा (दाळवाले) आणि मयूर नारायण राणा (दाळवाले) या दोघांविरुध्द पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला़
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, नथ्थू भामरे, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, राहुल सानप, मनोज बागुल, श्रीशेल जाधव, केतन पाटील, दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे़ यातील मयूर राणा याला ताब्यात घेण्यात आले आहे़ तर, अन्य राजेंद्र राणा हा फरार आहे़ 

Web Title: Dhalnika's hidden cannabis hidden in the basement of 9 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.