धुळ्यात बदनामीची धमकी देत व्यापाºयाला गंडविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:36 PM2018-01-09T22:36:02+5:302018-01-09T22:36:51+5:30

फसवणूक : दोन महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

Dhangle threatened with defamation! | धुळ्यात बदनामीची धमकी देत व्यापाºयाला गंडविले!

धुळ्यात बदनामीची धमकी देत व्यापाºयाला गंडविले!

Next
ठळक मुद्देप्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यापाºयाला बोलाविले घरातकुमार नगर भागात राहणाºया व्यापाºयाला देवपुरात फसविले२ महिलांसह ४ पुरुषांविरुध्द पोलिसात गुन्ह्याची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने घरात बोलावून फोटो काढून सोशल मिडीयावर बदनामीची धमकी देत दोन महिलेसह सहा जणांनी एका व्यापाºयाला गंडविले़ ही घटना देवपूर परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली असून ८३ हजाराची लूट देखील करण्यात आली़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली़
साक्री रोडवरील कुमार नगर भागात राहणाºया प्रकाश मोरुमल आसीजा (५२) या व्यापाºयाने धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, शुक्रवारी ७ वाजेच्या सुमारास देवपुर भागातील गवळे नगरातील एका घरात अज्ञात दोन महिलांनी त्या व्यापाºयाला बोलाविले़ तो व्यापारी घरात गेल्यानंतर त्या ठिकाणी लपलेल्या अन्य चार जणांनी घराचे दार लावून घेतले़ सदर व्यापाºयाचे कपडे काढून घेतल्यानंतर फोटो काढून घेतले़ हे फोटो सोशल मिडीयावर टाकण्यात येईल अशी धमकीही त्याला देण्यात आली़ यासाठी १० लाखांची मागणीही त्याच्याकडे करण्यात आली़ या व्यापाºयाकडून ८३ हजार रुपये रोख बळजबरीने काढून घेण्यात आले़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेनंतर व्यापाºयाने त्यांच्यापासून आपला जीव वाचविला़ याप्रकरणी त्या व्यापाºयाने शहर पोलीस ठाण्यात आपबिती कथन केली़ त्यानुसार सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन महिलांसह सहा जणांविरुध्द भादंवि कलम ३८४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद निकम करीत आहेत़ घटनेची चर्चा होत आहे़ 

Web Title: Dhangle threatened with defamation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.