धुळ्यातील पांझरा चौपाटी स्वत:हून हटविण्यास सुरूवात!
By admin | Published: June 21, 2017 01:05 PM2017-06-21T13:05:28+5:302017-06-21T13:05:28+5:30
53 स्टॉल्स जेसीबी, ट्राला, क्रेनच्या सहाय्याने रात्री अकरा वाजेपासून काढण्यास प्रारंभ
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे, दि. 21 - शहरातील पांझरा चौपाटीप्रश्नी मंगळवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कामकाज झाल़े यावेळी जिल्हा प्रशासनाच्या अधिका:यांना चौपाटीवर कारवाई करून कार्यवृत्तांत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिल़े या आदेशानंतर पांझरा चौपाटी स्वत:हून काढण्यास रात्री 11 वाजता सुरूवात करण्यात आली़ यावेळी लोकसंग्रामचे नेते तेजस गोटे, दिलीप साळूंखे व कार्यकर्ते उपस्थित होत़े
पांझरा चौपाटीच्या जागेवर मनपाचे बगिचाचे आरक्षण असूनही याठिकाणी बेकायदेशिर चौपाटी उभारून तिचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचा आक्षेप घेत ललित वारूडे यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली असून त्याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाल़े यावेळी नायब तहसीलदार ज्योती देवरे यांनी न्यायालयात प्रशासनाची बाजू मांडतांना चौपाटीवरील स्टॉलधारकांना आधीच नोटिसा बजाविल्या असल्याचे सांगितल़े त्यावर न्यायालयाने बुधवारी कारवाई करून गुरूवारी कारवाईचा कार्यवृत्तांत अहवाल छायाचित्रांसह सादर करण्याचे आदेश दिल़े त्यानंतर रात्री 11 वाजता पांझरा चौपाटीवर स्टॉल्स स्वत:हून हटविण्यास सुरूवात करण्यात आली़ जेसीबी, क्रेन, ट्रक, रिक्षाव्दारे चौपाटीवरील स्टॉल्स उचलण्यात आल़े मध्यरात्री उशिरार्पयत काम सुरू होत़े