दगडफेकीच्या निषेधार्थ धुळे येथे मोर्चासह धरणे!
By admin | Published: May 26, 2017 12:45 PM2017-05-26T12:45:19+5:302017-05-26T12:45:19+5:30
आयुक्त निवासस्थान दगडफेक प्रकरण : हल्लेखोरांना अटक करण्याची निवेदनाव्दारे मागणी
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.26-महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांच्या निवासस्थानावर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चासह धरणे आंदोलन करण्यात आल़े लालबावटा मनपा कामगार युनियनतर्फे मोर्चा तर नियोजित धुळे सिटीझन फोरमतर्फे धरणे आंदोलन करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करण्यात आली़
सिटीझन फोरमतर्फे धरणे
आयुक्त संगीता धायगुडे यांच्या घरावर झालेल्या दगडफेक प्रकरणाचा निषेध नोंदवत नियोजित धुळे सिटिझन फोरमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आल़े त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आल़े यावेळी महापौर कल्पना महाले, हेमंत मदाने, रवी बेलपाठक, मिलींद बैसाणे यांच्यासह अन्य उपस्थित होत़े
लालबावटा युनियनतर्फे मोर्चा
लालबावटा मनपा कामगार युनियनतर्फे दगडफेकीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आल़े पोलीसांनी समाजकंटकांना त्वरीत अटक करावी अशी मागणी संतोष शिंदे, विलास हाताळगे, हासिन मुश्ताक, दौलत देवरे, बापू अहिरे, किरण धर्मा, अंबादास थोटे यांनी केली़