धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण: ... तोपर्यंत अस्थिविसर्जन करणार नाही, नरेंद्र पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:06 AM2018-02-14T06:06:40+5:302018-02-14T06:06:58+5:30

सरकारकडे वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्याने मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेले शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे.

Dharma Patil suicide case: ... Until then, will not give up on immunization, Narendra Patil's information | धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण: ... तोपर्यंत अस्थिविसर्जन करणार नाही, नरेंद्र पाटील यांची माहिती

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण: ... तोपर्यंत अस्थिविसर्जन करणार नाही, नरेंद्र पाटील यांची माहिती

Next

धुळे : सरकारकडे वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्याने मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेले शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. परंतु प्रत्यक्ष हातात मोबदला मिळत नाही, तोपर्यंत अस्थिविसर्जन करणार नाही, अशी माहिती त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
अद्याप एकाही अधिकाºयाने आमची भेट घेतलेली नाही किंवा पत्रही पाठविलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मोबदला मिळत नाही; तोपर्यंत माझ्या वडिलांच्या अस्थिंचे विसर्जन करणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.
विखरण येथील प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकरी धर्मा पाटील यांना कमी मोबदला मिळाला होता. त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, त्यांना यश मिळत नसल्याने त्यांनी नैराश्यात मंत्रालयाबाहेर विषप्राशन केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर शासनाने जिल्हा प्रशासनाला जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश दिले होते. आदेशानुसार प्रशासनाच्या पातळीवर कार्यवाही करण्यात आली होती. सरकारकडून नव्याने देण्यात येणाºया या मोबदल्यात नव्या कायद्यातील तरतुदीनुसार सानुग्रह अनुदानाचा समावेश आहे. आंब्याच्या झाडांचे मूल्यही विचारात घेण्यात आले आहे.

५४ लाख मोबदला मिळणार
शासनाकडून धर्मा पाटील यांच्या नावे २८ लाख ५ हजार ९८४ तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्या नावे २६ लाख ४२ हजार १४८ असा एकूण ५४ लाख ४८ हजार १३२ रुपयांचा मोबदला मान्य करण्यात आला आहे.

Web Title: Dharma Patil suicide case: ... Until then, will not give up on immunization, Narendra Patil's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.