जमिनीचा योग्य मोबदल्यासाठी धुळ्यात शेतकºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:05 PM2018-02-15T15:05:56+5:302018-02-15T15:06:51+5:30

बैठक घेऊन निर्णय घेऊ : उद्योगमंत्र्यांचे आश्वासन

Dholak farmer's movement for proper compensation of land | जमिनीचा योग्य मोबदल्यासाठी धुळ्यात शेतकºयांचे आंदोलन

जमिनीचा योग्य मोबदल्यासाठी धुळ्यात शेतकºयांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देजमिनीस योग्य मोबदला देण्याची मागणी करत शेतकºयांचे धरणेरोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलनास पाठिंंबा महिन्याच्या आत बैठक घेऊन निर्णय घेण्याच उद्योगमंत्र्यांचे आश्वासन 

 लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अतिरिक्त नरडाणा औद्योगिक क्षेत्रासाठी टप्पा क्र.तीन अंतर्गत अधिग्रहित शेतजमिनील योेग्य मोबदला द्या किंवा सातबाºयावर एमआयडीसे मारलेले शिक्के उठवा अन्यथा इच्छामरणास परवानगी द्या अशी मागणी करत तेथील शेतकºयांनी गुरूवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या प्रश्नी शेतकºयांच्या भावना तीव्र असून रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनीही लोकप्रतिनिधी या नात्याने आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दिला. त्यांनीच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी याबाबत बोलणे केले. यावर एक महिन्याच्या आत बैठक घेऊन सरकारतर्फे जास्तीत जास्त  चांगला भाव देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या आंदोलनात माजी आमदार प्रा.शरद पाटील, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा तालुक्यातील गोराणे, मेलाणे, माळीच, जतोडा आदी गावांमधील शेतकरी बहुसंख्येने  सहभागी झाले होते. 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांनी धरणे दिले. यावेळी रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनीही पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
शेतकरी जमिनी देण्यास तयार आहेत. मात्र योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. ८ वर्षांपासून त्यांच्या जमिनीच्या सातबाºयावर एमआयडीसीचे शिक्के मारल्याने त्यांना त्यांची विक्री करता येत नाही, बागायती करायची म्हटली तर बॅँकेचे कर्ज मिळत नाही. सरकार योग्य मोबदला देत नसल्याने प्रकल्पबाधित शेतकरी पूर्णपणे हैराण झाले असून त्यांच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. कारण यापूर्वी या प्रश्नी चार बैठका झाल्या असून पालकमंत्र्यांना शिंदखेडा दौºयावेळी निवेदने दिली आहेत. मात्र अद्यात त्यातून काहीही मार्ग निघालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकरी त्रस्त झाले असून जमिनीला योग्य मोबदला द्या अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्यासाठी इच्छामरणास परवानगी द्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 
यावेळी मंत्री रावल यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे केले. शेतकºयांच्या भावना याप्रश्नी तीव्र असून त्वरित मार्ग काढावा अशी त्यांची अपेक्षा असल्याचे देसाई यांना सांगितले. त्यावर लवकरात लवकर बैठक घेऊन या प्रश्नी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मंत्री रावल यांनी या बैठकीची जबाबदारी घेत असल्याचे सांगून लवकरात लवकर बैठक घेऊन सरकारतर्फे जास्तीत जास्त भाव देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. या आंदोलनात कैलास पाटील, प्रमोद सिसोदे, संजीवनी सिसोदे, भाजयुमोचे राम भदाणे, राजेंद्र पाटील, सत्यजित सिसोदे, कमलेश भामरे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सहभागी झाले होते. 

Web Title: Dholak farmer's movement for proper compensation of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.