धुळ्यात स्वप्नातले घर स्वप्नातच राहणार!

By Admin | Published: April 2, 2017 01:49 PM2017-04-02T13:49:05+5:302017-04-02T13:49:05+5:30

वाढविलेल्या रेडीरेकनरच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे स्वप्नातील घर स्वप्नातच राहणार असून सरसकट करण्यात आलेली दरवाढ अत्यंत अयोग्य असल्याचे मत बिल्डर्स असोसिएशनने व्यक्त केल़े

Dhulal dream house will be in dream! | धुळ्यात स्वप्नातले घर स्वप्नातच राहणार!

धुळ्यात स्वप्नातले घर स्वप्नातच राहणार!

googlenewsNext

 रेडीरेकनर दरात सरसकट वाढ अयोग्य : ‘जीएसटी’मुळे सर्वसामान्यांचे स्वप्नभंग निश्चित

धुळे,दि.2-: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वाढविलेल्या रेडीरेकनरच्या दरांमुळे सर्वसामान्यांचे स्वप्नातील घर स्वप्नातच राहणार असून सरसकट करण्यात आलेली दरवाढ अत्यंत अयोग्य असल्याचे मत बिल्डर्स असोसिएशनने व्यक्त केल़े  धुळयात रेडीरेकनरच्या दरात झालेल्या 6़69 टक्के सरासरी वाढ झाली असून लवकरच येणा:या जीएसटीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले जाईल, असे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आह़े
राज्यात दरवर्षी रेडीरेकनरच्या दरात जानेवारीपासून वाढ होत असत़े  परंतु गेल्या वर्षापासून रेडीरेकनर दरातील वाढ 1 एप्रिलपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्यानुसार शनिवारी 1 एप्रिलला शासनाने रेडीरेकनरचे वाढीव दर जाहीर केल़े 
सरसकट दरवाढ अयोग्यच!
नोटाबंदीमुळे जमिनीचे व्यवहार अत्यंत कमी झालेले असतांना रेडीरेकनरच्या दरात झालेल्या वाढीमुळे मंदीच्या परिस्थितीत भरच पडणार आह़े मुळात रेडीरेकनरचे दर जाहीर होण्यापूर्वी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची समिती प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेत असत़े मात्र या समितीने योग्यपणे आढावा न घेत सरसकट वाढ सुचविणे योग्य नाही, असे बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आह़े शहरात चितोड रोडवर बाजारभावापेक्षा सरकारी दर जास्त असू शकतो, तर त्याच्याच विरूध्द वलवाडी भागात बाजार भाव जास्त असू शकतो़ त्यामुळे प्रत्येक भागात रेडीरेकनर दरात फरक पडत असतो़ मात्र ही बाब लक्षात न घेता सरसकट वाढ केल्याने विशिष्ट क्षेत्रच विकसित होईल व अविकसित क्षेत्र ‘जैसे थे’ राहील़  त्यामुळे प्रत्येक भागातील भौगोलिक परिस्थिती व भविष्यात होणारी वाढ लक्षात घेऊन रेडीरेकनर दरवाढ आवश्यक आह़े
स्वस्त घरे अशक्यप्राय!
रेडीरेकनर दरातील वाढीमुळे जागांचे व पर्यायाने बांधकामाचे दरही वाढतात़ सिटी सव्र्हे क्रमांकानुसार शहरात 500 रुपयांपासून 22 हजार रूपये प्रती चौरस मीटरप्रमाणे असलेल्या दरात आता आणखी वाढ होईल़ जागेच्याच किमती वाढल्याने स्वस्त घरे उपलब्ध होणे अवघड आह़े शहरात आग्रा रोड, दत्त मंदिर परिसर, रेल्वेस्थानक परिसर, मालेगाव रोड, वलवाडी परिसर, देवपूर, साक्री रोड या भागात रेडीरेकनरचे दर वेगवेगळे असल्याने काही भागात वस्ती वेगाने वाढते तर काही भाग संथपणे विकसित होत असल्याचे दिसत़े मात्र रेडीरेकनर दरवाढीमुळे शहरालगत नव्याने विस्तारत असलेल्या भागात जागेचे भाव वाढणार आहेत़  1 चौरस मीटर म्हणजे सुमारे 10 फूट जागा होत असून खुली जागा, निवासी व व्यावसायिक वापरासाठी प्रती चौरस मीटरप्रमाणे लागू करण्यात आलेल्या रेडीरेकनर दरानुसार खरेदी-विक्रीचे दस्त नोंदणी केले जातात़ 
जीएसटीचा फटका बसणार!
सर्वसामान्यांच्या स्वस्त घरांना बाधा आणणारा निर्णय रेडीरेकनर दरवाढीमुळे झाला असला तरी जीएसटीमुळे घरस्वप्न अशक्यप्राय होणार आह़े जीएसटीमुळे बांधकाम साहित्याच्या दरात 18 ते 27 टक्क्यांर्पयत वाढ होणार असून त्यामुळे घरांची खरेदी सर्वसामान्यांना शक्य होणार नाही़ एवढेच नव्हे तर भाडेतत्वावर घरे घेऊन राहणेही सर्वसामान्यांना अवघड होऊन बसणार आह़े
 
रेडीरेकनर दरात सरसकट वाढ करण्यात आली असून ती अयोग्य आह़े या वाढीमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न भंग होणार असून जीएसटीमुळे तर अशक्यप्राय होणार आह़े सरकार केवळ दिशाभूल करीत आह़े                
  -संजय देसले, अध्यक्ष, बिल्डर्स असो़, धुळे
 
रेडीरेकनर दरात झालेल्या वाढीमुळे घरांच्या किंमतीत वाढ होणार आह़े त्यामुळे सर्वासाठी घर हे स्वप्नच राहील़ रेडीरेकनर दरात अंदाजे वाढ न करता वस्तुस्थिती तपासण्याची मागणी केली होती, परंतु तसे झाले नाही़ 
  -संजय अहिरराव, बांधकाम व्यावसायिक, धुळे

Web Title: Dhulal dream house will be in dream!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.