धुळ्यात १२०० विद्यार्थी करतील सावरकरांच्या गीतांचे समूहगायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:37 AM2019-01-31T11:37:28+5:302019-01-31T11:38:34+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रम
आॅनलाइन लोकमत
धुळे : अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनानिमित्त १ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ४ वाजता १२०० विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीतांचे समूहगायन करणार आहेत. हा कार्यक्रम जे.आर. सिटी. हायस्कुलच्या मैदानावर होणार आहे.
धुळे शहरात २ व ३ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१ रोजी सकाळी १० वाजता महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, नगरसेवक तसेच स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक, अनुप अग्रवाल यांच्याहस्ते सावरकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता जे.आर.सीटी हायस्कुलच्या मैदानावर १२०० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समूहगायनाचा कार्यक्रम होणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे दादा इदाते, रवींद्र साठे, विनोद पवार, डॉ. अशोक मोडक, प्रा. प्रकाश पाठक, संतोष अग्रवाल, विनोद मित्तल, जितूभाई चौटीया, संजय अग्रवाल, विनोद पालेशा, पवन पोद्दार हर्षल विभांडीक, संजय जाधव उपस्थित राहणार आहेत.