Dhule: पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा, निजामपूरची घटना, ५ जणांना नंदुरबार येथे हलविले

By अतुल जोशी | Published: March 16, 2023 05:31 PM2023-03-16T17:31:25+5:302023-03-16T17:31:44+5:30

Dhule:   पिसाळलेल्या कुत्र्याने येथे बुधवारी धुमाकूळ घालत, निजामपूर-जैताणे गावात तब्बल १७ जणांना चावा घेतला.कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या पाच जणांना नंदुरबार येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Dhule: 17 bitten by crushed dog, Nizampur incident, 5 shifted to Nandurbar | Dhule: पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा, निजामपूरची घटना, ५ जणांना नंदुरबार येथे हलविले

Dhule: पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा, निजामपूरची घटना, ५ जणांना नंदुरबार येथे हलविले

googlenewsNext

निजामपूर(जि.धुळे) -  पिसाळलेल्या कुत्र्याने येथे बुधवारी धुमाकूळ घालत, निजामपूर-जैताणे गावात तब्बल १७ जणांना चावा घेतला.कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या पाच जणांना नंदुरबार येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
बुधवारी सकाळी शाळे तील दोन लहान विद्यार्थिनींना चावा घेतल्यानंतर पिसाळलेला कुत्रा धावत सुटला. त्यानंतर त्याने भाजी विक्रेते, टरबूज विक्रेते यांनाही चावा घेतला.

सायंकाळी उशिरा पर्यंत एकंदर १७ जणांना त्या कुत्र्याने चावे घेतले. कुत्र्यच्याा हल्यात जखमी झालेल्यांना जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात इंजेक्शन देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ आकाश गावीत यांनी सांगितले. तर कुत्र्याच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या ५ रुग्णांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान गावात लहान मुलांना,लोकांना खबरदारीच्या दृष्टीने सोशल मीडिया वरून दवंडीची क्लिप टाकण्यात आली.

दरम्यान मोकाट कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करावा अशी अपेक्षाही नागरिकांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नगर पालिका हद्दीतील कुत्रे पकडून रात्रीच्यावेळी निजामपूर जैताणे येथे सोडण्यात येतात असे प्रकार ताबडतोब बंद व्हावेत अशी मागणी होऊ लागली आहे.

Web Title: Dhule: 17 bitten by crushed dog, Nizampur incident, 5 shifted to Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.