धुळ्यात 6 हजार 200 व्यापा:यांनी केली नोंदणी!

By admin | Published: July 1, 2017 01:08 PM2017-07-01T13:08:37+5:302017-07-01T13:08:37+5:30

जीएसटीबाबत संभ्रम कायम, फक्त 300 व्यापा:यांची नोंदणी बाकी

Dhule 6 thousand 200 traders: By registering! | धुळ्यात 6 हजार 200 व्यापा:यांनी केली नोंदणी!

धुळ्यात 6 हजार 200 व्यापा:यांनी केली नोंदणी!

Next

 ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.1 - वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी करप्रणाली शनिवार, 1 जुलैपासून लागू झाली़ जिल्ह्यातील 20 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 6 हजार 500 पैकी सुमारे 6 हजार 200 व्यापा:यांनी जीएसटीची नोंदणी केली आह़े शुक्रवारी विक्रीकर विभागातर्फे व्यापा:यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्यासाठी  वस्तू व सेवा कर भवनात मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती विक्रीकर उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ दरम्यान, या करप्रणालीच्या अंमलबजावणीबाबत व्यापारी आणि अधिका:यांसह कर सल्लागारांमध्ये संभ्रमावस्था कायम आह़े  
जीएसटी करप्रणाली शनिवारपासून लागू होत असल्यामुळे विक्रीकर भवन कार्यालयाने भवनाचे नामांतर करून वस्तू व सेवा कर असे ठेवले आह़े जिल्ह्यात 6 हजार 500 व्यापारी आहेत़ ज्यांची वार्षिक उलाढाल 20 लाखांच्या वर आहे त्यांना जीएसटीची नोंदणी बंधनकारक आह़े जिल्ह्यातील तालुकानिहाय मार्गदर्शन शिबिर भरविण्यात आले होत़े व्यापा:यांनी नोंदणी करण्यासाठी 30 सप्टेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आह़े 
अद्यापही ब:याच व्यापा:यांची जीएसटीचा नंबर घ्यावा की नाही अशी संभ्रमावस्था आह़े व्यापारी महासंघ व खान्देश चेंबर्स असोसिएशनतर्फे व्यापा:यांना मार्गदर्शन करण्यात आले आह़े वेळोवेळी अशाप्रकारचे मार्गदर्शन दिले जाणार आह़े या कर प्रणालीचा व्यवहार हा ऑनलाइन असल्यामुळे कर चुकवेगिरीला आळा बसणार आह़े व्यवहारात पूर्णपणे पारदर्शकता असणार आह़े असे असलेतरी आजही सर्वामध्ये प्रणालीबाबत गोंधळ आणि काहीसी भीती असल्याचे कर सल्लागारांचे म्हणणे आह़े 

Web Title: Dhule 6 thousand 200 traders: By registering!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.