Dhule: धुळे शहराच्या आमदारांविरोधात अपहार, भ्रष्टाचार व कट कारस्थान केल्याचा वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:07 AM2023-10-29T00:07:15+5:302023-10-29T00:10:25+5:30
Dhule: धुळे शहरातील वडजाई रोडवरील टिपू सुल्तान यांचे वादग्रस्त स्मारक उभारल्याप्रकरणी शहराचे आमदार फारुख शहा यांच्यावर अपहार, भ्रष्टाचार व कट कारस्थान केल्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
- राजेंद्र शर्मा
धुळे - शहरातील वडजाई रोडवरील टिपू सुल्तान यांचे वादग्रस्त स्मारक उभारल्याप्रकरणी शहराचे आमदार फारुख शहा यांच्यावर अपहार, भ्रष्टाचार व कट कारस्थान केल्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. तर आमदार फारुख शहा यांनी ही सहा महिन्यापूर्वीची घटना आहे. त्यात माझा काही रोल नसून लेखी सुद्धा नाही, तरीही आपण याप्रकरणी सोमवारी आपण स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
शहरातील वडजाई रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आलेला टिपू सुल्तान चौक पोलिस बंदोबस्ता रात्रीतून काढण्यात आला होता. या घटनेनंतर भाजपाचे रोहीत चांदोडे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावेळी १९ जून २०२३ रोजी रोहित चांदोडे यांनी चाळीसगावरोड पोलीस स्टेशनला आमदार फारुख शहा यांनी कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे चौथरा उभारुन शासकीय मालमत्तेचे विद्रृपीरण केल्याची तक्रार दिली होती. त्यावरुन जून महिन्यात चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला होता. या प्रकरणी बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी रोहित चांदोडे यांचा पोलिसांनी पुरवणी जबाब घेतला. या जबाबानुसार शनिवारी आमदार शहा यांच्याविरोधात भांदवि कलम १२०-ब, ४०९, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ प्रमाणे कट कारस्थान रचणे, अपहरण व भ्रष्टाचार केल्याबद्दल वाढीव कलम लावण्यात आले आहे..
आपण ललित पाटील संदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर-पाटील यांच्या बद्दल गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे जुन्या गुन्हयात वाढीव कलम लावण्यात आले आहे. शिळया कढीला उत देण्याचा हा प्रकार आहे. याप्रकरणात माझा कुठलाही रोल नाही. यासंदर्भात माझे कुठलेही लेखी नाही. ते काम अडीच वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. सहा महिन्यापूर्वी ते रात्रीतून पाडण्यात आले. त्यावेळेसही आपण शहरातील शांतता अबाधित ठेवण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. अधिकारी डॉ शेखर-पाटील खुनशी वृत्तीचे आहे. माझ्या जीवाला धोका संभवल्यास डॉ शेखर-पाटील जबाबदार राहतील. आपण स्वत:च सोमवारी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात जाणार आहोत. तसेच पोलिसांनी माझी चौकशी करावी, असे सांगणार आहोत. - आमदार फारुख शाह