धुळे- बस-दुचाकी अपघातात काकू-पुतण्या ठार, बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल

By अतुल जोशी | Published: September 25, 2023 02:39 PM2023-09-25T14:39:41+5:302023-09-25T14:40:25+5:30

बस-दुचाकी याच्यात झालेल्या अपघातात काकू व पुतण्या ठार झाला.

Dhule- Aunt-nephew killed in bus-bicycle accident, case registered against bus driver | धुळे- बस-दुचाकी अपघातात काकू-पुतण्या ठार, बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल

धुळे- बस-दुचाकी अपघातात काकू-पुतण्या ठार, बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

धुळे : बस-दुचाकी याच्यात झालेल्या अपघातात काकू व पुतण्या ठार झाला. हा अपघात निजामपूर-नंदुरबार रस्त्यावर लंगडी भवानी मंदिराजवळ रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास  झाला. दिलीप शांतीलाल चव्हाण (वय ३२), बेबीबाई संजू चव्हाण (वय ४५, दोन्ही रा.सडगाव हेंकळवाडी,ता.धुळे)अशी मयतांची नावे आहेत. बसचालकाविरूद्ध निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप चव्हाण हा त्याची सासरवाडी जामदा येथे शालकाला भेटण्यासाठी दुचाकीने (क्र.एमएच १८-बीवाय ४२२७)गेलाहोता.त्याच्यासोबत काकू बेबीबाई संजू चव्हाण या होत्या. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दोघेही सडगाव हेंकळवाडी येथे घरी येण्यासाठी निघाले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या पुणे-नंदुरबार बसने (क्र. एमएच २०-बीएल ३३८६) दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघाताची माहिती मिळताच निजामपूरचे पोलिस घटनास्थळी पोहचले. दिलीप चव्हाण यास जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, डॅाक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर बेबीबाई चव्हाण हिस नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी दीपक सुरेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिस स्टेशनला बस चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहे. 

Web Title: Dhule- Aunt-nephew killed in bus-bicycle accident, case registered against bus driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.