धुळे बाजार समितीची तीन लाखांची उलाढाल केवळ 35 हजारावर!
By admin | Published: June 2, 2017 01:05 PM2017-06-02T13:05:21+5:302017-06-02T13:05:21+5:30
शेतकरी बंदचा मका खरेदीवर सर्वाधिक परिणाम
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.2- शेतक:यांनी विविध प्रश्नांवर राज्यभर आंदोलन पुकारले आह़े धुळ्याच्या बाजार समितीत त्याचा परिणाम जाणवला़ मक्याची उलाढाल अडीच ते तीन लाखांर्पयत होत होती, तीच आता केवळ 35 हजारावर आली आह़े अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरख पाटील यांनी दिली़ दरम्यान भाजीपाल्याच्या आवकवर सुध्दा परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितल़े
शेतकरी संपाला जिल्ह्यातून प्रतिसाद लाभत आह़े धुळे, साक्री दोंडाईचा येथील बाजार समित्यांसह पिंपळनेर उपबाजार समितीच्या आवारात शेतकरी फिरकलेच नाही़ शेतक:यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकत शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला़
धुळ्याच्या बाजार समिती आवारात शुक्रवारी सकाळपासून शुकशुकाट होता़ शेतक:यांनी कोणत्याही प्रकारचा शेतीमाल विक्रीसाठी आणलेला नव्हता़ केवळ भाजीपालाच थोडय़ा प्रमाणात होता़ शेतीमालाची कुठलीही आवक झालेली नव्हती़
संपाच्या दुस:या दिवशी सुध्दा धुळ्यातील बाजार समितीत त्याचे पडसाद उमटल़े सध्या धुळे बाजार समितीत मक्याची आवक मोठय़ा प्रमाणावर येत होती़ एरव्ही 700 ते 800 पोते येणारा मका आता या संपामुळे केवळ 30 पोत्यांवर आला आह़े परिणामी अडीच ते तीन लाखांर्पयत होणारी आर्थिक उलाढाल केवळ 35 ते 40 हजारावर आली आह़े साहजिकच त्याचा फटका बाजार समितीला सोसावा लागत आह़े बाजार समितीत शांतता होती़