Dhule: बेटावदच्या व्यावसायिकाला १२ लाखांचा गंडा, गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

By देवेंद्र पाठक | Published: April 13, 2023 06:17 PM2023-04-13T18:17:35+5:302023-04-13T18:18:04+5:30

Crime News: टरबूज खरेदी करून गुजरात राज्यातील दोघा व्यापाऱ्यांनी शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील व्यावसायिकाला १२ लाख २५ हजार रुपयांत गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dhule: Betwad businessman extorted 12 lakhs, fraud case against two Gujarat businessmen | Dhule: बेटावदच्या व्यावसायिकाला १२ लाखांचा गंडा, गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Dhule: बेटावदच्या व्यावसायिकाला १२ लाखांचा गंडा, गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा

googlenewsNext

- देवेंद्र पाठक
धुळे : टरबूज खरेदी करून गुजरात राज्यातील दोघा व्यापाऱ्यांनी शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील व्यावसायिकाला १२ लाख २५ हजार रुपयांत गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात नरडाणा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रहिम खान रशिद खान पठाण (वय ४८, रा. बेटावद ता. शिंदखेडा) यांनी नरडाणा पोलिसात फिर्याद दाखल केली.

त्यानुसार, गुजरात राज्यातील गोध्रा येथील दोन व्यापाऱ्यांनी रहिम खान यांच्याशी संपर्क साधला. ‘हमको आपसे फ्रूट लेना हे. आप अच्छा माल बेचते हो, आपको मिलना हे, आकर पुरी तरह व्यापार की बात करेंगे,’ असे सांगितले. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये दोघे बेटावद येथे रहिम खान यांच्याकडे आले. त्यांनी टरबूज पाहिजे, असे सांगत महिनाभरात पाठविलेल्या मालाचे पैसे देऊ, असे सांगितले. यावर विश्वास ठेवून रहिम खान यांनी वेळोवेळी तब्बल १२ लाख २५ हजार ११४ रुपयांचा माल गुजरातला रवाना केला; परंतु माल पोहोचूनही दोघा व्यापाऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर वर्षभराच्या अवधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रहिम खान यांनी नरडाणा पोलिस ठाणे गाठत दोघा व्यापाऱ्यांविरोधात बुधवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

 

Web Title: Dhule: Betwad businessman extorted 12 lakhs, fraud case against two Gujarat businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.