धुळे सीईओंच्या दालनाला ठोकले कुलूप; ठाकरे गटाचं आंदोलन

By अतुल जोशी | Published: February 23, 2024 01:09 PM2024-02-23T13:09:10+5:302024-02-23T13:09:32+5:30

शिंदखेडा तालुक्यात शिक्षकांची अपूर्ण संख्या असल्याने, जि.प. सदस्या सुनीता सोनवणेंनी घेतला आक्रमक पवित्रा

Dhule CEO's office locked; agitation of Thackeray group | धुळे सीईओंच्या दालनाला ठोकले कुलूप; ठाकरे गटाचं आंदोलन

धुळे सीईओंच्या दालनाला ठोकले कुलूप; ठाकरे गटाचं आंदोलन

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अनेक जि.प.शाळांमध्ये शिक्षक नाही. काही शिक्षक शाळेची वेळ पूर्ण होण्यापूर्वीच निघून जातात, शिक्षक शाळेत दारू पितात तरी प्रशासन कारवाई करीत नाही, चार वर्षांपासून शिंदखेडा सिंचन विहिरी मंजूर झाल्या नाहीत आदी कारणावरून ठाकरे गटानं आंदोलन केले.  

जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे व शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी शुक्रवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनाला कुलूप ठोकत दालनासमोरच ठिय्या मांडला. अखेर जि.प. अध्यक्षा धरती देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर तसेच सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे सीईओंनी आश्वासन दिल्यानंतर सोनवणे दाम्पत्यांने आंदोलन मागे घेतले. एक तासानंतर सीईओंच्या दालनाचे कुलूप उघडण्यात आले.

Web Title: Dhule CEO's office locked; agitation of Thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.