धुळे : भगवान परशुराम यांच्या जयघोषाने शहर दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:12 AM2019-05-08T11:12:52+5:302019-05-08T11:13:27+5:30
शहरात सकाळी दुचाकी रॅली व सायंकाळी शोभायात्रा काढली, समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी परशुराम युवा मंचतर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी समाजबांधव व महिला
धुळे : ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी दुचाकी रॅली व सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली.
बहुभाषिक ब्राह्मण महासंघ
शहरातील एकविरा देवी मंदिरापासून सकाळी बहुभाषिक ब्राह्मण महासंघाची रॅलीचा शुभारंभ अॅड़ माधव प्रसाद वाजपेयी, रत्नाकर रानडे, शेखर कुलकर्णी, अभय नाशिककर, महेश मुळे यांच्या हस्ते झाला. खोलगल्लीत रॅलीचा समारोप झाला. अॅड़ वाय. बी.जोशी, दीपक खंडेलवाल, माधव बापट, सतीश शुक्ल, उपेंद्र अर्थेकर, ओमप्रकाश खंडेलवाल, गोपाळ तिवारी, ओम शर्मा, दत्तात्रय कुलकर्णी, केशव जोशी,अतुल पेडवाल, राजकुमार शर्मा, श्रीकांत देशपांडे, प्रसाद वर्तक आदी समाज बांधव उपिस्थत होते.
सायंकाळी काढलेल्या शोभायात्रेत परशुराम युवा मंचचे अध्यक्ष भूषण जोशी, कार्याध्यक्ष अनिल दीक्षित, जयेश वावदे, प्रशांत वैद्य, अरूण जोशी, नायब तहसीलदार तुषार भट, डॉ. बी.आर.पाठक, डॉ. प्रविण जोशी आदी उपस्थित होते.