धुळे शहर पोलिसांचे हात रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 09:58 PM2019-12-30T21:58:07+5:302019-12-30T21:58:41+5:30

यशवंत नगरातील घरफोडी : तपासाचे धागेदोरे नसल्याने अडचणी

Dhule city police empty hands | धुळे शहर पोलिसांचे हात रिकामेच

धुळे शहर पोलिसांचे हात रिकामेच

googlenewsNext

धुळे : साक्री रोडवरील यशवंत नगरात झालेल्या धाडसी घरफोडीच्या घटनेत कोणत्याही प्रकारचे धागेदोरे शहर पोलिसांच्या हाती लागलेले नाही़ परिणामी शोध कामात मोठ्या प्रमाणावर अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तरीदेखील चोरट्यापर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी सांगितले़
साक्री रोडवरील यशवंत नगरातील गुरुनानक मंदिराजवळ राहणाऱ्या जयश्री शंकर महाले या महिलेने फिर्याद दाखल केली़ जयश्री यांचा भाऊ हंसराज शंकर महाले यांचे निधन झाल्याने त्या आकाशवाणी केंद्राजवळील ओमनगरात राहणाºया त्यांच्या भावाच्या घरी गेल्या होत्या़ भावाकडील सर्व कार्यक्रम आटोपून त्या आपल्या घरी आल्यावर त्यांना घराचा दरवाजाचा उघडा दिसला. संसारोपपयोगी साहित्य अस्ताव्यस्त फेकलेल्या अवस्थेत होते़ त्यांच्या घरातून २ लाख ६७ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ३७ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने लांबविला असल्याचे समोर आले आहे़
शहर पोलिसात घटनेची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली़ यशवंत नगरात चोरी झालेले घर भरवस्तीत असून याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाही़ घराच्या लोखंडी दाराला कुलूप लावले होते़ कोणत्याही प्रकारची सुरक्षितता दिसून आली नाही़ श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ यांनाही बोलाविण्यात आले होते़ परंतु त्यांच्यामार्फत अशी ठोस दिशा मिळू शकलेली नाही़ परिणामी ही घरफोडी घटनेतील चोरट्यांना शोधण्यासाठी शहर पोलिसांना आता कंबर कसावी लागावी लागणार आहे़

Web Title: Dhule city police empty hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे