Dhule: स्टेशन रोड भागात दोन गटांत हाणामारी, तुषार नवलेंसह चार जणांना गंभीर दुखापत

By देवेंद्र पाठक | Published: September 7, 2023 04:39 PM2023-09-07T16:39:52+5:302023-09-07T16:42:33+5:30

Dhule Crime News: शहरातील स्टेशन रोड भागातील एका चौकात बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हाणामारी झाल्याची घटना घडली. यात तुषार नवले यांच्यासह चार जणांना गंभीर दुखापत झाली

Dhule: Clash between two groups in Station Road area, four people including Tushar Navale seriously injured | Dhule: स्टेशन रोड भागात दोन गटांत हाणामारी, तुषार नवलेंसह चार जणांना गंभीर दुखापत

Dhule: स्टेशन रोड भागात दोन गटांत हाणामारी, तुषार नवलेंसह चार जणांना गंभीर दुखापत

googlenewsNext

- देवेंद्र पाठक 
धुळे - शहरातील स्टेशन रोड भागातील एका चौकात बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हाणामारी झाल्याची घटना घडली. यात तुषार नवले यांच्यासह चार जणांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

याप्रकरणी गुरुवारी सकाळी घटनेची प्राथमिक नोंद शहर पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून, तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील एका चौकात मागील भांडणाची कुरापत काढून तुषार रावण नवले, ऋषिकेश संजय आगलावे, भूषण भास्कर शेलार, नीरज प्रवीण शर्मा (सर्व रा. अण्णासाहेब पाटील नगर, धुळे) या सर्वांना धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींचा जबाब नोंदविण्यासाठी शहर पोलिसांचे पथक रुग्णालयात गेले होते.

डॉक्टरांना अहवाल देऊन रुग्ण जबाब देण्याच्या परिस्थितीत आहेत का, याबाबत पोलिसांनी डॉक्टरांकडे विचारणा केली होती. त्यावरून घटनेतील जखमी रुग्ण हे जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. जखमी रुग्णांचा जबाब घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री तरुणांच्या दाेन गटांत एका जागेच्या वादातून ही हाणामारी झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून त्वरित स्टेशनरोडसह परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रीच धरपकड करून तीन जणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

Web Title: Dhule: Clash between two groups in Station Road area, four people including Tushar Navale seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.