धुळे-दादर एक्स्प्रेस‎ आता डेली, पॅसेंजरची एक फेरी वाढवणार - डाॅ. सुभाष भामरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 04:54 PM2023-09-11T16:54:17+5:302023-09-11T16:54:57+5:30

धुळे ते दादर एक्स्प्रेस आता राेज धावणार म्हटल्यावर धुळेकरांना कामकाज व व्यवसायानिमित्त राेज राज्याची तथा देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई गाठता येणे शक्य हाेणार आहे.

Dhule-Dadar Express will now add one round of daily, passenger - Dr. Subhash Bhamre | धुळे-दादर एक्स्प्रेस‎ आता डेली, पॅसेंजरची एक फेरी वाढवणार - डाॅ. सुभाष भामरे

धुळे-दादर एक्स्प्रेस‎ आता डेली, पॅसेंजरची एक फेरी वाढवणार - डाॅ. सुभाष भामरे

googlenewsNext

राजेंद्र शर्मा

धुळे : धुळे ते दादर एक्स्प्रेस ही आठवड्यातून तीन‎ दिवसांऐवजी राेज धावणार आहे. रेल्वे‎ प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला‎ असून लवकरच परिपत्रक निघणार आहे, अशी माहिती खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी दिली. यासह धुळे ते चाळीसगाव या पॅसेंजरच्या चार फेऱ्या दरराेज हाेत असून रात्रीची एक फेरी वाढविण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, धुळे ते दादर एक्स्प्रेस आता राेज धावणार म्हटल्यावर धुळेकरांना कामकाज व व्यवसायानिमित्त राेज राज्याची तथा देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई गाठता येणे शक्य हाेणार आहे.

दसेरा मैदानजवळील रेल्वे गेट येथे भुयारी मार्गाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी बाेलताना डाॅ. भामरे यांनी ही माहिती दिली. मतदारांना दिलेली सर्व आश्वासने आपण पाळणार असल्याची ग्वाही त्यांनी यानिमित्त दिली. गाडी क्रमांक ०१०६५ डाऊन‎ दादर-धुळे एक्स्प्रेस ही दादरहून‎ रविवार, सोमवार आणि शुक्रवार‎ सायंकाळी ४:१५ वाजता सुटते.‎ धुळे स्थानकावर रात्री ११:३५‎ वाजता पोहोचते, तर गाडी क्रमांक‎ ०१०६६ अप धुळे-दादर एक्स्प्रेस ही‎ गाडी धुळे येथून सोमवार,‎ मंगळवार व शनिवारी सकाळी‎ ६:३० वाजता सुटते, तर दादर येथे‎ दुपारी १:१५ वाजता पोहोचते.‎ व्यापारी, नागरिकांना‎ मुंबईत व्यापारानिमित्त तसेच‎ मंत्रालयात जाण्यासाठी ही गाडी‎ सोईची ठरते. ही एक्स्प्रेस‎ आठवड्यातून तीन दिवस धावत हाेती व तिला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎ मिळाल्याने ती दैनंदिन सुरू हाेणार आहे.

रेल्वे, काेळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी २९ एप्रिल राेजी धुळे स्थानकावरून या स्पेशल एक्स्प्रेस ट्रेनच्या सेवेला हिरवी झेंडी दाखवत रवाना केले हाेते. या गाडीत एक एसी चेयर कार, आठ सेकंड क्लास सीटिंग, दाेन जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक वॅन अशी व्यवस्था आहे. ही गाडी शिरुड, जामदा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नासिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे अशा ठिकाणी थांबते. येथील शेतकरी, व्यापारी, नाेकरदार व राजकारणी आदी सर्वच घटकांना आरामदायी प्रवास करत राज्याची तथा देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई गाठता येणार आहे. जिल्ह्यातील व्यापाराला चालना मिळावी या हेतूने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Dhule-Dadar Express will now add one round of daily, passenger - Dr. Subhash Bhamre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे