धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली

By अतुल जोशी | Published: November 9, 2023 02:55 PM2023-11-09T14:55:53+5:302023-11-09T14:57:19+5:30

रेल्वेची अधिसूचना, खासदार डॅा. भामरे यांची माहिती

Dhule-Dadar Express will run daily; Dhulekar was facilitated for Mumbai | धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली

धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली

धुळे : प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन मुंबई-धुळे एक्स्प्रेस दररोज धावणार असल्याची अधिसूचना रेल्वे विभागाने जारी केल्याची माहिती खासदार डॅा. सुभाष भामरे यांनी दिली आहे. दरम्यान धुळे-मुंबई एक्स्प्रेस दररोज धावण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, ही एक्सप्रेस धुळे ते दादर अशी आहे. 

धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे नव्हती. धुळे-चाळीसगाव रेल्वेला दोन मुंबई बोगी लावण्यात येत होत्या. पुढे या दोन्ही बोगी अमृतसर एक्स्प्रेसला जोडण्यात येत होत्या. मात्र, लॉकडाऊनच्या काळात ही सेवा बंद झाली होती. तेव्हापासून धुळ्याहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नसल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले होते. त्यामुळे स्वतंत्र दोन बोगींऐवजी मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करावी अशी मागणी डॅा. भामरे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने  धुळे-दादर एक्स्प्रेस प्रायोगिक तत्वावर २९ एप्रिल २०२३ पासून सुरू केली. ही गाडी सध्या तीन दिवस धावते. अधिसूचना जारी केली आहे. नियमित होणाऱ्या गाडीचा क्रमांकही बदलविण्यात आला आहे. ही गाडी मुंबईहून दुपारी १२ वाजता सुटून रात्री ८.५० वाजता धुळ्यात पोहचेल. तर धुळ्याहून सकाळी ६.३० वाजता सुटून दुपारी २.१५ वाजता मुंबईला पोहचणार असल्याचे पत्रात म्हटलेले आहे. 

Web Title: Dhule-Dadar Express will run daily; Dhulekar was facilitated for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.