धुळे उपशिक्षणाधिकारी शांताराम दुसाने यांचा पदभार काढला
By admin | Published: May 21, 2017 05:48 PM2017-05-21T17:48:58+5:302017-05-21T17:48:58+5:30
शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ लिपीकाच्या निलंबनापाठोपाठ आता शांताराम दुसाने यांच्याकडे असलेला प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश दिले आहे.
Next
धुळे,दि.21-शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ लिपीकाच्या निलंबनापाठोपाठ आता शांताराम दुसाने यांच्याकडे असलेला प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार काढून घेण्याचे आदेश नाशिकचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिले आहे.
यासंदर्भातील आदेश 20 रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी जे.एस.पाटील यांना प्राप्त झाले आहेत. 22 मार्च 2017 रोजी तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांना लाच घेताना पकडल्यामुळे ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. म्हणून या रिक्त पदांवर प्रभारी जे.एस.पाटील आणि प्रभारी उपशिक्षणाधिकारी पदावर विस्तार अधिकारी शांताराम दुसाने यांची नियुक्ती करण्यात आली होती.
दुसाने यांच्या कार्यपद्धती विरोधात संग्राम पाटील, प्रवीण शिंदे, इतर काही लोकांनी थेट शिक्षण आयुक्त यांच्याकडे तक्रारी करून त्यांचे उपशिक्षणाधिकारी पद रद्द करण्याची मागणी केली होती. दुसानेंच्या विरोधात असलेल्या तक्रारींची संख्या विचारात घेऊन शिक्षण उपसंचालकांनी तडकाफडकी त्यांना सोपविलेला कार्यभार काढून घेण्याचे आदेश दिले आहेत.