धुळे जिल्ह्यात बारावीसाठी २५ हजार ३५७ विद्यार्थी प्रविष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 05:51 PM2019-02-20T17:51:46+5:302019-02-20T17:53:13+5:30
४४ केंद्रावर होणार परीक्षा, शिक्षण विभागातर्फे परीक्षेची तयारी पूर्ण
आॅनलाइन लोकमत
धुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी इयत्ता बारावीची परीक्षा गुरूवार २१ पासून सुरूवात होत आहे. यासाठी जिल्ह्यातील २५ हजार ३५७ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट
झालेले आहेत.
जिल्ह्यात ४४ केंद्रावर बारावीची परीक्षा होणार आहे. यामध्ये धुळे शहरामध्ये ७, धुळे ग्रामीणमध्ये १४, साक्री तालुक्यात ९, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी ७-७ अशा एकूण ४४ केंद्रावर परीक्षा होणार आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ३५७ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत. यात धुळे शहरात ६ हजार १२, धुळे ग्रामीण मध्ये ६ हजार ५७४, साक्री तालुक्यात ५ हजार १७४, शिरपूर तालुक्यात ४ हजार ३५, व शिंदखेडा तालुक्यात ३ हजार ५६२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ज्या खोलीत करण्यात आलेली आहे, तेथील बाकांवर विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक बुधवारीच टाकण्यात आले होते. तसेच परीक्षार्थींचा क्रमांक कोणत्या खोलीत आहे, याची माहिती केंद्रातील सूचना फलकावर लिहिण्यात आली होती. बुधवारी सायंकाळी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेत आपला क्रमांक कोणत्या खोलीत आहे, ते पाहण्यासाठी गर्दी केलेली होती.