धुळे जिल्ह्यात ४ हजार ८०४ प्रकरणे तडजोडीने निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 09:52 PM2017-12-09T21:52:31+5:302017-12-09T21:53:40+5:30

राष्ट्रीय लोकअदालत : ५ कोटी १९ लाख रुपयांची नुकसानभरपाई 

In Dhule district 4,04 cases were settled by compromise | धुळे जिल्ह्यात ४ हजार ८०४ प्रकरणे तडजोडीने निकाली

धुळे जिल्ह्यात ४ हजार ८०४ प्रकरणे तडजोडीने निकाली

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय लोकअदालतीचे कामकाज धुळे शहर, शिरपूर, दोंडाईचा, साक्री, शिंदखेडा येथे झाले़ वादपुर्व व प्रलंबित २१ हजार प्रकरणे ठेवली होती़यात ४ हजार ८०४ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राष्ट्रीय लोकअदालतीचे कामकाज जिल्ह्यातील पाच न्यायालयांमध्ये शनिवारी पार पडले़ यात ४ हजार ८०४ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली़ लोक अदालतमध्ये ५ कोटी १९ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली़ 
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत पार पडली़ धुळे शहर १४, शिरपूर ३, दोंडाईचा व साक्रीत प्रत्येकी २ आणि शिंदखेड्यात १ असे २२ पॅनल होते़ वादपुर्व व प्रलंबित २१ हजार प्रकरणे ठेवली होती़ तसेच नुकसान भरपाईसह ८१ लाख रुपयांची वसुलीही झाली़ शांततेत कामकाज पार पडले़ 

Web Title: In Dhule district 4,04 cases were settled by compromise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.