धुळे जिल्ह्याचे ४८६ रिपोर्ट निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:30 PM2020-04-25T17:30:49+5:302020-04-25T17:32:30+5:30

७० जणांचे रिपोर्ट प्रलंबित

 Dhule district 486 reports negative | धुळे जिल्ह्याचे ४८६ रिपोर्ट निगेटीव्ह

dhule

googlenewsNext

धुळे : येथील शासकीय हिरेवैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी आलेल्या स्वॅब नमून्यापैकी शनिवारी ४८६ रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. अजून ७० नमून्याचे रिपोर्ट बाकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या २१ आहे. त्यात धुळयातील तीन आणि साक्रीतील एक असे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
साक्री शहरात शुक्रवारी रात्री दोन रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आले होते. त्या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्याक्तींचा प्रशासन शोध घेत आहे. तसेच संपर्क झालेल्या व्यक्तींचा तपास लागल्यावर त्याचे स्वॅब घेत आहे. तसेच धुळे शहरातील एका माजी नगरसेवकाच्या भावाचा २३ एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्याही संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्याचे स्वॅब तपासणीसाठी घेत आहे. एकूण ७० अहवाल प्रलंबित आहेत. या सर्वांचा रिपोर्ट शनिवारी सायंकाळी उशीरा प्राप्त होण्याची शक्यता हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.पंकज शेजवळ यांनी दिली.

Web Title:  Dhule district 486 reports negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे