धुळे जिल्ह्यात मद्यपी तरुणांचा पोलिसांवर हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:14 PM2018-06-14T22:14:34+5:302018-06-14T22:14:34+5:30

पोलीस निरीक्षकासह तीन जखमी : शिंदखेड्यातील भगवा चौकातील घटना, चार अटकेत 

In the Dhule district, alcoholic youths attacked the police | धुळे जिल्ह्यात मद्यपी तरुणांचा पोलिसांवर हल्ला 

धुळे जिल्ह्यात मद्यपी तरुणांचा पोलिसांवर हल्ला 

Next
ठळक मुद्देपोलीस निरीक्षकासह तीन जखमी शिंदखेडा येथील भगवा चौकातील घटनाचौघांविरूद्ध गुन्हा, सर्वांना केली अटक 

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : शहरातील भगवा चौकात मद्यप्राशन करून हातात दांडके घेऊन धिंगाणा घाणाºया चार तरुणांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच त्यांनी हल्ला चढविला. हल्यात पोलीस निरीक्षक सतीश गोराडे आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी चारही तरुणांना अटक केली आहे.
शिंदखेडा शहरातील भगवा चौकात रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास  आकीब इस्माईल पठाण (वय २७) स्टेट बँकेच्या मागे, गोपाल रमेश परदेशी (२०) माळी वाडा, आकाश नानाभाऊ सोनवणे (३१)स्टेशनरोड भिलाटी, आणि सलमान मुश्ताक खाटी (३५) रा. अशोक टॉकीजजवळ सर्व रा. शिंदखेडा हे चौघी तरुण  मद्यप्राशन करुन हातात दांडके घेऊन गाड्या अडवून शिवीगाळ करीत दहशत माजवित परिसरात धिंगाणा घालत होते. यासंदर्भात माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पोलीस कॉन्स्टेबल नथ्थु माळी आणि अविनाश सुदाम लोखंडे हे  त्यांना पकडण्यासाठी भगवा चौकात पोहचले. त्याचवेळी चिमठाणा दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण हे सुद्धा आपल्या पथकासह त्याठिकाणी आले. यांनी त्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी यांच्यावरच हल्ला चढविला. हल्यात पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या उजव्या हाताची दोन बोटे फॅक्चर  झाली. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नथ्थू माळी यांचा हात फॅक्चर झाला आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल अविनाश सुदाम लोखंडे यांच्या कपाळाला मार लागला आहे.  शेवटी चारही तरुणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल सुशीलकुमार रामचंद्र गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील चारही आरोपीविरोधात भांदवि कलम ३३३, ३३२, ३२५, ३५३, १८६, ३४१, ११०, ११२/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: In the Dhule district, alcoholic youths attacked the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.