धुळे जिल्हा बँकेला दोन पुरस्कार प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:19 PM2019-09-23T22:19:49+5:302019-09-23T22:20:08+5:30
गोव्यात झाले वितरण : देशभरातील ६०० प्रतिनिधी होते उपस्थित
धुळे : येथील धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले़ फ्रन्टियर्स इन कॉर्पोरेटिव्ह बँकींग अवॉर्ड अर्थात एफसीबीएतर्फे हे पुरस्कार देण्यात आले़ त्यात रुपे डेबीट व केसीसी कार्ड इनोव्हेशन अवॉर्ड व बेस्ट एनपीए मॅनेजमेंट अवॉर्डचा समावेश आहे़
देशभरातील ३१९ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला हा पुरस्कार मिळाला आहे़ या पुरस्काराचे वितरण गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात करण्यात आले़
संमेलनाला देशभरातील सहकार क्षेत्रातील सहाशे प्रतिनिधी उपस्थित होते़
गोवा राज्याचे सहकार मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, सरव्यवस्थापक विजय सावंत आदींनी हा पुरस्कार स्विकारला़ धुळ्यात आल्यानंतर हा पुरस्कार बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे व संचालकांकडे सुपुर्द करण्यात आला़ दरम्यान, मागील वर्षी देखील बँकेला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला होता़