धुळे जि.प. सीईओंनी धरले ग्रामसेवकांना धारेवर
By admin | Published: June 10, 2017 01:22 PM2017-06-10T13:22:09+5:302017-06-10T13:22:09+5:30
जुलै महिनाअखेर तालुक्यातील वैयक्तीक शौचालये व घरकुलांची कामे पूर्ण करा, अन्यथा लाभथ्र्याना यापुढे पैसा मिळणार नाही
ऑनलाईन लोकमत
शिरपूर , जि. धुळे, दि. 3 - ग्रामीण भागातील कामांचा आढावा घेताना तेथील कामे प्रलंबित असल्याचे समोर आल्यानंतर जि.प. सीईओ गंगाथरन देवराजन यांनी ग्रामसेवकांना चांगलेच धारेवर धरले. जुलै महिनाअखेर तालुक्यातील वैयक्तीक शौचालये व घरकुलांची कामे पूर्ण करा, अन्यथा लाभथ्र्याना यापुढे पैसा मिळणार नाही, असे सांगत ग्रामसेवकांनी टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी तंबी त्यांनी दिली.
शिरपूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी जि.प सीईओंनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम व प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अपूर्ण घरकुल बांधकामाचा आढावा घेतला़ बैठकीला डीआरडीए विभागाचे उपअभियंता पी़एस़झळके, गटविकास अधिकारी एम़डी़बागुल, सहाय्यक बीडीओ सुवर्णा पवार, बांधकाम उपअभियंता सी़पी़ खैरणार, लघुसिंचन विभागाचे उपअभियंता हितेश भटुरकर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़प्रताप पावरा, कृषी अधिकारी भरत कोळेकर, डॉ़वाडीले व विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होत़े
काम सांगूनही न ऐकल्याने काढली अधिका:यांची खरडपट्टी
गेल्या आठवडय़ापूर्वी तालुक्यातील ग्रामसेवकांना कामांबाबत सूचना देवूनही ती कामे पूर्ण नाहीत़ मंजुर लाभाथ्र्याची यादी अपडेट, मतदार यादीतील दुबार नावे व मयत लोकांची नावे वगळण्याचे सांगूनही ते अद्याप झालेले नाही. अशा ग्रामसेवकांची सीईओंनी खरडपट्टी काढली़
6 ग्रामसेवकांची दांडी
ग्रामसेवकांना माहिती असतांना सुध्दा 90 पैकी 6 ग्रामसेवकांनी बैठकीला दांडी मारली म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे त्यांनी सांगितल़े दर दिवशी किमान 10 शौचालये बांधली गेली पाहिजेत, तसा अहवाल दररोज सादर करा, असेही सीईओ म्हणाले.