धुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:24 AM2019-02-15T11:24:08+5:302019-02-15T11:24:57+5:30

लोकसभा, विधानसभा निवडणूक : कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतांना माहितीचा होणार उपयोग

Dhule district collector's information collection | धुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरू

धुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या माहितीचे संकलन सुरू

Next
ठळक मुद्देशिक्षकांकडून २० कलमी माहिती भरून घेतली जात आहे.आगामी निवडणुकीसाठी माहितीचा होणार उपयोग

आॅनलाइन लोकमत
धुळे : आगामी काळात होणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात येत आहे. यात त्यांना निवडणुक ड्युटीबरोबरच मतदानाचा हक्कही बजावता यावा हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये प्रिती सुधा इंग्लिश मेडीयम हायस्कुलमध्ये बुधवारी अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
दोन टप्यात ही बैठक झाली. यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी.के. पारधी, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.बी.घुगे, भारती भामरे, रोहीणी नांद्रे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
बैठकीत शिक्षक, मुख्याध्यापक यांची सविस्तर माहिती घेण्यात आली. यात ते मुळचे कुठले, कोणत्या मतदार संघातील रहिवाशी आहेत, नोकरीला कधीपासून लागले, सध्या राहतात कुठे आदी २० कलमी माहिती भरून घेण्यात आली. यात शिक्षकांना निवडणुकीची ड्युटी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा या दृष्टीने ही सर्व माहिती संकलित करण्यात आली.
काही कर्मचारी अपंग असतात. त्यांनाही निवडणुकीची ड्युटी देण्यात येते. नंतर ऐनवेळी ती ड्युटी रद्द करणाºयांचा गोंधळ होत असतो. हे सर्व टाळण्यासाठीच ही माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे बॅँक खाते क्रमांकही घेण्यात आला. त्यामुळे यापूर्वी निवडणुकीचे काम करणाºया कर्मचाºयांना मानधन दिले जाते. आता हे मानधन त्यांच्या खात्यावर आॅनलाइन पद्धतीने जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.सकाळच्या सत्रात २०० मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तर दुपारच्या सत्रात १५० मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. संकलित केलेली माहिती जिल्हाधिकाºयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
 

Web Title: Dhule district collector's information collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.