धुळे जिल्हा परिषदेतर्फे २० शेतकºयांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 03:39 PM2018-09-07T15:39:42+5:302018-09-07T15:43:31+5:30
कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी, शेकडो शेतकरी उपस्थित
आॅनलाइन लोकमत
धुळे : कृषी क्षेत्रात उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाºया जिल्ह्यातील २० शेतकºयांचा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे आज सन्मान करण्यात आला. यात सहा महिला शेतकºयांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते होते. उदघाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, कृषी व पशुसंवर्धन सभापती लिलावती बेडसे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती नूतन निकुम, जि.प. सदस्या राजपूत, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, पराग बेडसे, किरण पाटील आदी होते.
या कार्यक्रमात सुवर्णमाला संभाजीराव देशमुख (चिंचवार), नामदेव लालसिंग सोनवणे (भिल) (फागणे), रवींद्र भिवसन पाटील (विसरणे), जयेश भरत पवार (वलवाडी), हकुमचंद वना माळी (बोरकुंड), निर्मला ओंका मावची (चरणमाळ), स्वरूपसिंग जोम्या गावीत (केळीपाडा), सुक्राम शामू गवळी (बाभळदे), रामचंद्र शंकर सोनवणे (धमनार), जयप्रकाश ब्रिजलाल सिसोदीया (गणेशपूर), निलाबाई भिलाजी पाटील (वनावल), शिवाजी नजºया पावरा (फत्तेपूर), कल्याणसिंग सरदारसिंग राजपूत (भावेर), देवीदास काशिनाथ कोळी (तोंदे), जगदीश वसंत पाटील (बलकुवे), सुभाष विजयसिंग गिरासे (देगाव), अरूणा अनिल गिरासे (शेवाडे), जागृती भिका पाटील (अलाणे), जगमल गुला ठाकरे (सतारे), तिरोणा सुरेश पाटील (डाबली) या २० शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल,श्रीफळ महिला शेतकºयाला साडीचोळी तर पुरूष शेतकºयाला ड्रेस देवून गौरविण्यात आले.
या वेळी बोलतांना गंगाथरन देवराजन म्हणाले की, आपण शेती करतो याचा शेतकºयाला अभिमान वाटला पाहिजे. शहरी भागातील नागरिकाला आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जीम मध्ये जावे लागते, मॉर्निग वॉकला जावे लागते. मात्र शेतकरी हा शेतात कबाडकष्ट करतो, घाम गाळतो त्यामुळे त्याचे आरोग्य नेहमीच सुदृढ राहते. शेतकरी हा खºया अर्थाने जगाचा पोशिंदा आहे.
शिवाजी दहिते म्हणाले, शेतकºयांचे मार्गदर्शन हे दिशा देणारे आहेत. शेतकºयांना वीज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.
प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी प्रल्हाद सोनवणे यांनी केले. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.