गौरव पुरस्कारापासून धुळे जिल्हा वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 06:42 PM2019-02-15T18:42:12+5:302019-02-15T18:42:35+5:30

डॉ़ आनंदीबाई जोशी पुरस्कार : चौकशी करण्याची अ‍ॅड़ चंद्रकांत येशीराव यांची मागणी

Dhule District deprived from the Gaurav Puraskar | गौरव पुरस्कारापासून धुळे जिल्हा वंचित

गौरव पुरस्कारापासून धुळे जिल्हा वंचित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : डॉ़ आनंदीबाई जोशी यांचा अवमान करणारे आणि जिल्ह्यास गौरव पुरस्कारापासून वंचित ठेवणारे अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी करण्यात यावी़ त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी डॉ़ आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार जिल्हास्तरीय निवड समितीचे सदस्य अ‍ॅड़ चंद्रकांत येशीराव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे़ 
भारतातील पहिल्या महिला डॉ़ आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतिपित्यर्थ शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने दरवर्षी शासकीय तथा अशासकीय आरोग्य संस्थांना पुरस्कार देण्यात येतो़ पुरस्कार हा रोखीने व प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात येत असतो़ यामध्ये ५ हजारापासून तर एक लाखांपर्यंत वैयक्तिक तसेच संस्था स्तरावर पुरस्कार देण्यात येतो़ यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात डॉ़ आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार जिल्हास्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आलेली आहे़ ही समिती आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अथवा उपजिल्हा रुग्णालय यांना भेट देत असते़ निवड समितीने पुरस्काराच्या निकषाप्रमाणे मुल्यमापन करुन सदर अहवाल समितीचे सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर बैठकीमध्ये ठेवायचा असतो़ त्या अहवालावर चर्चा होऊन पुरस्कार प्राप्त आरोग्य संस्थांची निवड केली जाते़ यामध्ये आरोग्य उपकेंद्रासाठी २२, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २७ तसेच ग्रामीण रुग्णालय अथवा उपजिल्हा रुग्णालयासाठी ३० निकष देण्यात आलेले आहेत़ या निकषांच्या आधारे समितीने प्रत्यक्ष पाहणी करुन मुल्यमापन करावयाचे असते़ २०१७-१८ या वर्षात समितीने प्रत्यक्ष भेटी देवून मुल्यमापन करुन अध्यक्षांसमोर अहवाल ठेवण्यात आला होता़ त्यावर चर्चा होऊन पुरस्कार प्राप्त आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली होती़ पुरस्कार वितरणापुर्वी याबाबत एक तक्रार आली आणि ही प्रक्रिया वादात सापडली़ परिणामी पुरस्कार वितरण झालेले नाही़ २०१८-१९ या वर्षात शासनाच्या परिपत्रकानुसार डॉ़ आनंदीबाई जोशी पुरस्कार देण्यासाठी कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आल्याचे दिसून आलेले नाही़ परिणामी याही वर्षी पुरस्काराचे वितरण होऊ शकलेले नाही़ 

पुरस्काराचे वितरण मागील दोन वर्षापासून होऊ शकलेले नाही़ ही खेदजनक बाब आहे़ पुरस्कार वितरण समारंभास कोणत्या गंभीर बाबीमुळे स्थगिती आली, याची कसून चौकशी झाली पाहीजे़ 
- अ‍ॅड़ चंद्रकांत येशीराव

Web Title: Dhule District deprived from the Gaurav Puraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे