धुळे जिल्ह्यात अवघे 12 टक्के कर्ज वाटप
By admin | Published: June 6, 2017 05:46 PM2017-06-06T17:46:06+5:302017-06-06T17:46:06+5:30
खरीप हंगाम : 6 बॅँकांचीच बरी कामगिरी, गतवर्षी याच कालावधीत झाले होते 21 टक्के वाटप
Next
>ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.6 - जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाकरीता राष्ट्रीयकृत बॅँकांतर्फे शेतक:यांना अवघे 12 टक्के कर्ज वितरित करण्यात आले आहे. 20 बॅँकांमार्फत शेतक:यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यापैकी केवळ सहाच बॅँकांची कर्ज वाटपाची टक्केवारी दोन अंकी संख्येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामाकरीता 950 कोटी तर रब्बी हंगामाकरीता 130 असे एकूण 1080 कोटी रुपये पीक कर्ज स्वरुपात शेतक:यांना वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी हेच उद्दिष्ट 1 हजार 8 कोटी होते. त्या तुलनेत यंदा 72 कोटी रुपये उद्दिष्ट जास्त आहे. मात्र प्रतिसाद गतवर्षापेक्षा कमी असल्याचा सूर व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी अशा विविध 20 बॅँकांच्या मिळून एकूण 170 शाखांच्या माध्यमातून शेतक:यांना पीक कर्ज वितरित केले जात आहे. त्यापैकी अलाहाबाद बॅँक 12 टक्के, बॅँक ऑफ इंडिया 23 टक्के, देना बॅँक व आयडीबीआय प्रत्येकी 19 टक्के, एचडीएफसी बॅँक 32 व धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅँक सर्वाधिक 38 टक्के या सहाच बॅँकांनी कर्ज वाटपाची दोन आकडी टक्केवारी गाठली आहे. उर्वरीत बॅँकांची कामगिरी फारशी दमदार नाही.