धुळे जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवास थाटात सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:34 PM2018-01-22T14:34:22+5:302018-01-22T14:35:27+5:30

ग्रंथदिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधले, पुस्तक प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

Dhule District Level Granth Festival | धुळे जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवास थाटात सुरूवात

धुळे जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवास थाटात सुरूवात

Next
ठळक मुद्देग्रंथदिंडीत ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभागग्रंथदिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधलेमान्यवरांच्याहस्ते ग्रंथोत्सवाचे उदगाटन



लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियान जिल्हा परिषद धुळे अंतर्गत धुळे जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवास आजपासून थाटात सुरवात झाली. तीन दिवसीय या ग्रंथोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
 सकाळी ९ वाजता शिक्षणाधिकारी कार्यालय (माध्यमिक) येथे महापौर कल्पना महाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्याहस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ही दिंंडी डॉ. आंबेडकर पुतळा, शहीद स्मारक, जिल्हा परिषद, जिजामाता हायस्कूल,झाशीची राणी पुतळामार्गे कमलाबाई कन्या शाळेत पोहचली. यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या वेशभूषा साकारल्या होत्या. ग्रंथदिंडीत शहरातील १९ शाळांमधील ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या ग्रंथदिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधले होते. 
यानंतर जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवाचे उदघाटन पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष अहिरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मोहन देसले, ज्येष्ठ साहित्तिका सुलभा भानगावकर, स्त्री शिक्षण संस्थेच्या सचिव अनुराधा गरूड यांच्याहस्ते झाले.
यावेळी बोलतांना सुभाष अहिरे म्हणाले की, समाजात ग्रंथ संस्कृती रूजविणे महतवचे आहे. वाचकांची अभिरूची लक्षात घेऊन, ग्रंथाची निर्मिती झाली पाहिजे.
तर शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे म्हणाले, मातृभाषेतूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे.
याप्रसंगी कमलाबाई कन्या शाळेच्या आवारात भरविण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाचे मान्यवरांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.
दरम्यान दुपारच्या सत्रात बालकवींचे संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम झाले.


 

Web Title: Dhule District Level Granth Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.