धुळे जिल्ह्यात दूधाला ५५ रूपये लिटर भाव द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:38 AM2019-08-04T11:38:48+5:302019-08-04T11:39:50+5:30
दूध उत्पादकांचा मेळाव्यात ठराव, मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले
आॅनलाइन लोकमत
धुळे : व्यापाऱ्यांना ५० रूपये लिटर पेक्षा कमी दराने दूध विक्री करू नये, तसेच दूधाला ५५ रूपये लिटर भाव मिळाला पाहिजे असे महत्वपूर्ण ठराव आज करण्यात आले.
दूध उत्पादकांचा मेळावा येथील कामगार कल्याण भवनात धुळे तालुका दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठाकरे (पाटील) मोरोणे यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. त्यात वरील ठराव करण्यात आले. यावेळी राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे, धीरज पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
दुग्ध व्यवसायातील व्यापारी आपल्या मर्जीप्रमाणे वागत आहेत. दूधाचे भावही ते स्वत:च ठरवितात. दुधाची खरेदी करतांना मावा पद्धतीने शेतकऱ्यांना भाव दिला जातो. ही पद्धत चुकीची आहे. याशिवाय दुधाच्या भावात व्यापाºयांकडून कटती लावली जाते. मोबाईलवर कटती लावली जाते. यामुळे व्यापारी चांगले पैसे कमतवितात. दूध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होतात. ही मक्तेदारी मोडीत काढण्यात यावी, व्यापाºयांनी दुधाची खरेदी करतांना उत्पादक शेतकºयांवर होणारा अन्याय थांबवावा यासाठी धुळे तालुका दूध उत्पादक संघटनेची स्थापना करण्यात आली.
दरम्यान संघटनेतर्फेउपनिवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून धुळे तालुका दुष्काळाच्या छायेत आहे. कोरडवाहू जमीन मोठ्या प्रमाणात असल्याने गरजेपुरता देखील शेतीतून उत्पन्न मिळत नाही. पुरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादक कर्जाने गायी, म्हशी घेऊन दुधाचा व्यवसाय करतात. मात्र कोरड्या चाºयाच्या किंमती किलोमागे १० ते १२ रूपयांनी वाढल्या आहेत. पशुच्या दवाखान्याचा खर्च दुपटीने वाढलेला आहे. दुधाळ जनावरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. गायी, म्हशींना चारा, पाणी, औषधे वेळेवर दिली नाही तर ती भाकड होतात. त्यांना अवघ्या २० २५ हजार रूपयांना विकावे लागतात. त्यामुळे दूध उत्पादक कर्जबाजारी होत आहे. धुळ्यात डेअरी चालक ४० रूपये दराने दूध खरेदी करीत असतात. मावा पद्धतीने भाव दिला जातो. दुधाच्या भावात कटती लावतात. त्यामुळे उत्पादकांचे नुकसान होत असते, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना अनेकजण उपस्थित होते.