धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे शासनविरोधात हल्लाबोल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 02:06 PM2017-11-30T14:06:29+5:302017-11-30T18:18:50+5:30

घोषणांनी परिसर दणाणला, विविध मागण्यांचे निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिले निवेदन 

Dhule District President - Wadi Congress attacked the government against the attack | धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे शासनविरोधात हल्लाबोल आंदोलन

धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे शासनविरोधात हल्लाबोल आंदोलन

Next
ठळक मुद्देशिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरवातशासनविरोधातील घोषणांनी परिसर दणाणलाशेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.  शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, हमीभावाचे धोरण जाहीर करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन  निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.
आग्रा रोडवरील शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. पारोळा चौफुली, महानगरपालिकामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चेकºयांनी शासनविरोधात दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणला होता. 
राष्ट्रवादीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यावसायिक अशा सर्व स्तरामध्ये सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदी व जीएसटीच्या निर्णयामुळे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. राज्याच्या गरजेनुसार आवश्यक असलेले विषय प्राधान्य क्रमाने न घेता, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग यासारख्या योजनांसाठी राज्याचा महसूल वळविला जात आहे.  राज्यशासनाच्या या अनागोंदी व जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून हल्लाबोल आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करून, त्यांचा ७/१२ उतारा कोरा करण्यात यावा, हमी भावाचे धोरण जाहीर करण्यात यावे, गुजरातच्या धर्तीवर कापसाला हमीभावावर ५०० रूपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, धुळे जिल्ह्यातील पाटचाºयांचे नुतनीकरण करून, शेतीला सिंचनाचा लाभ मिळून द्यावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
मोर्चात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जिल्हाध्यक्ष (शहर) मनोज मोरे, ज्योती पावरा, सुवर्णा शिंदे, रवींद्र पाटील, जि.प. सदस्य किरण पाटील, कमलेश देवरे यांच्यासह जवळपास २०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 
 

Web Title: Dhule District President - Wadi Congress attacked the government against the attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.