बारावीचा धुळे जिल्ह्याचा निकाल 90.89 टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 04:48 PM2017-05-30T16:48:37+5:302017-05-30T16:48:37+5:30
विज्ञान शाखा आघाडीवर : किमान कौशल्य पिछाडीवर, निकालात गतवर्षापेक्षा 2.32 टक्क्यांनी वाढ
>ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.30 - जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल 90.89 टक्के एवढा लागला आहे. बारावीच्या सरासरी निकालात गतवर्षाप्रमाणे यंदाही विज्ञान शाखेने आघाडी घेतली तर किमान कौशल्य पिछाडीवर राहिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 98.04 टक्के निकाल विज्ञान शाखेचा तर सर्वात कमी 81.57 टक्के निकाल किमान कौशल्य (व्यावसायिक) शाखेचा लागला आहे. जिल्ह्याचा गतवर्षी बारावीचा निकाल 88.57 टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालाच्या टक्केवारीत 2.32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नाशिक विभागाच्या निकालात जिल्हा दुस:या क्रमांकावर आहे.
शाखानिहाय जिल्ह्याचा निकाल
जिल्ह्यात विज्ञान शाखा 98.04 टक्के, वाणिज्य शाखा 93.66 टक्के, कला शाखा 82.38 व किमान कौशल्य (व्यावसायिक) शाखेचा निकाल 81.57 एवढा लागला आहे.
पुनर्परीक्षार्थी (रिपीटर)चा निकाल 38.91 टक्के
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) म्हणून 973 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. त्या पैकी परीक्षेला 969 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्या पैकी 377 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 38.91 टक्के एवढीच आहे.
शाखानिहाय पुनर्परीक्षाथ्र्याचा निकाल
पुनर्परीक्षार्थी विज्ञान शाखेच्या 150 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. त्या पैकी 146 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्या पैकी 87 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 59.59 एवढी आहे.
वाणिज्य शाखेसाठी 26 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. ते सर्व परीक्षेला प्रविष्ट झाले. त्या पैकी केवळ 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 34.62 एवढी आहे.
कला शाखेसाठी 748 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. ते सर्व परीक्षेला प्रविष्ट झाले. त्या पैकी 256 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 34.22 एवढी आहे.
किमान कौशल्य शाखेसाठी 49 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती. ते सर्व परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यापैकी 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी 51.02 एवढी आहे.