अन्न प्रक्रिया उद्योगासाठी धुळे जिल्हयाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:55 AM2018-11-24T11:55:17+5:302018-11-24T11:56:43+5:30

महाराष्टÑातील सात जिल्ह्यांचा समावेश : उद्योग सुरू करण्याबाबत झाली प्राथमिक चर्चा

Dhule district is selected for food processing industry | अन्न प्रक्रिया उद्योगासाठी धुळे जिल्हयाची निवड

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी धुळे जिल्हयाची निवड

Next
ठळक मुद्देसुक्ष्म व लघुउद्योग व मध्यम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी  देशातील ८० जिल्ह्याची निवड महाराष्टÑातील सात जिल्ह्यांचा समावेश प्राथमिक स्तरावर झालेल्या बैठकीत जिल्हाभरातील चाळीस मंडळाचे मंडळ  अधिकारी उपस्थित

आॅनलाइन लोकमत
धुळे : देशात रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुक्ष्म व लघुउद्योग व मध्यम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी  देशातील ८० जिल्ह्याची निवड केली आहे. यात महाराष्टÑातील सात जिल्ह्यांचा समावेश असून, त्यात अन्नप्रक्रिया उद्योगासाठी धुळे जिल्ह्याची निवड  करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी सांगितले. 
 स्थानिक पातळीवर बेरोजगारांना रोजगारांच्या संधी प्राप्त व्हाव्यात, तसेच स्थानिक उत्पादनावर तेथे प्रक्रिया होवून ते नागरिकांना  उपलब्ध व्हावे  या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यात धुळे जिल्ह्याचा  अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निवड करण्यात आली.
 या योजनेची माहिती करून देण्यासाठी तसेच जिल्हयात  कोणत्या प्रकारचा अन्न प्रक्रिया उद्योग उभारला जावू शकतो यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी मेळावा झाला. 
या मेळाव्याला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, नायब तहसीलदार पंकज वाघ, अ‍ॅड. प्रकाश पाटील यांच्यासह  जिल्हयातील कृषी सहायक, महसूल मंडळ अधिकारी, बचत गटाच्या महिला, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला, शेती उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
या मेळाव्याच्या सुरवातीला डॉ. अंतुर्लीकर यांनी मार्गदर्शन करून योजनेची थोडक्यात माहिती दिली. 
 या बैठकीत जिल्ह्यतील कृषी उत्पादन व त्यावरील प्रक्रिया यासंदर्भात चर्चा करून प्रत्येक मंडळनिहाय नेमका कोणता उद्योग उभारता येवू शकतो याबाबतचा आढावा घेतला.  त्यात संबंधित मंडळात काय पिकते,  कोणते उत्पादन जास्त येते, तेथे पाण्याची  उपलब्धता कशा प्रकारे आहे, आदीची माहिती घेवून त्यावर चर्चा केली.  प्राथमिक स्तरावर झालेल्या बैठकीत जिल्हाभरातील चाळीस मंडळाचे मंडळ  अधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासह बचत गटांच्या सदस्यांकडून जिल्ह्यात कोणता अन्नप्रक्रिया उद्योगाची उभारणी केली जावू शकते यासंदर्भात चर्चा  करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून फॉर्म भरून माहिती संकलीत केली जाणार आहे. सुमारे दोन तास हा मेळावा सुरू होता.

Web Title: Dhule district is selected for food processing industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.