पंतप्रधान आवास योजनेत धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुका अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:38 PM2018-10-26T22:38:49+5:302018-10-26T22:42:25+5:30
योग्य अंमलबजावणी : तालुक्यातील सहा हजार लाभार्थ्यांना घरकुले
लोकमत आॅनलाईन
धुळे : पंतप्रधान घरकुल योजनेतून सर्वसामान्य व्यक्तीचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून अर्थसहाय्य केले जाते़ या योजनेतून जिल्ह्यातील १७ हजार २०७ लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाली आहे़ दरम्यान या योजनेतून शिरपूर तालुक्यातील ६ हजार ४७ लाभार्थ्यांनी लाभ मिळाला आहे़ त्यामुळे घरकुल योजनेत गेल्या दोन वर्षात शिरपूर तालुका अव्वल ठरला आहे़
अल्पउत्पन्न असणाºया आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काच्या घरा स्वप्न पूर्ण केले होत आहे़ आर्थिकदृष्या मागासलेल्या नागरिकांचे राहणीमानात बदल होऊन त्यांना हक्कांचे घर मिळण्यासाठी केंद्र व राज्यसरकार घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य करीत आहे़ घरकूल लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून एक लाख, कर्ज आधारित व्याज अनुदान देण्यात येते तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न घटकांसाठी परवडणाºया घरांची निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून अनुदान तर राज्य शासन एक लाखांचे अनुदान देणार आहे़आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास केंद्र शासन दीड लाख तर राज्य शासनाकडून एक लाखापर्यंत अनुदान दिले जात़े त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे स्वप्न या योजनेतून पुर्ण होत आहेग़्रामीण भागासह शहरातील झोपडपट्टयांचे पुनर्विकास होण्यासाठी घरकुल कर्ज, संलग्न व्याज, अनुदान देण्यात येत आहे़ त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाºया घरांचीनिर्मिती केली जात आहे़ पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी सन २०१६-१७ मध्ये ८५ टक्के उदिष्ठे प्रशासनाला देण्यात आले होते़ त्यात धुळे तालुक्यासाठी १२११, साक्री १९६०,शिरपूर २००१, तर शिंदखेडा तालुक्यासाठी ९७९ उदिष्टे होते़ दरम्यान २०१६-१७ मध्ये चारही तालुक्यातून ६०१५१ घरकुल बांधण्यात आले़ २०१९ पर्यत सर्वांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला घरकुलाचे उष्ठिटे वाढवून देण्यात आले आहे़
दरम्यान, घरकुल योजनेत धुळे, साक्री, शिंदखेडा तालुक्याच्या तुलनेत शिरपूर तालुका अव्वल असून तर शिंदखेडा तालुका मागे आहे़
आवास योजनेतून हक्काचे घरकुल़़़
सन २०१७-१८ मध्ये धुळे तालुक्याला १८८४, साक्री ३६५४, शिरपूर ४०४६, शिंदखेडा १४७० अशा ११ हजार ५४ घराचीनिर्मिती करण्यात आली़ घरकुल योजनेतून दोन वर्षात धुळे तालुक्यात ३०९५, साक्री ५६१४, शिंदखेडा २४४९ शिरपूर तालुक्यात ६०४७ लाभार्थी आहेत़ तर सुमारे दोनवर्षात १७ हजार २०५ लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल योजनेतून हक्काचे घर मिळाले आहे़