धुळे जिल्ह्यात कांद्याला भाव नसल्याने साठवणुकीकडे कल

By admin | Published: April 23, 2017 06:16 PM2017-04-23T18:16:26+5:302017-04-23T18:16:26+5:30

कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने अनेक शेतक:यांनी कांदा चाळीत साठवल्याचे चित्र आहे

In Dhule district there is no price for onions, because of storage it is tomorrow | धुळे जिल्ह्यात कांद्याला भाव नसल्याने साठवणुकीकडे कल

धुळे जिल्ह्यात कांद्याला भाव नसल्याने साठवणुकीकडे कल

Next

ऑनलाइन लोकमत

पिंपळनेर, जि. धुळे, दि. 23 -  साक्री तालुक्यातील विविध भागात सध्या उन्हाळी कांदा काढणीला वेग आला आहे. मात्र, कांदा उत्पादक शेतक:यांना  शेतातून काढलेल्या कांद्याला योग्य हमीभाव  मिळत नसल्याने अनेक शेतक:यांनी कांदा  चाळीत साठवल्याचे चित्र  आहे. दरम्यान, कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी 2 मेपासून तालुक्यातील विविध भागात कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्पादन खर्च निघणे अवघड
मोठय़ा कष्टाने शेतक:यांनी रात्रं-दिवस मिळेल, तसे पाणी देऊन कांद्याचे उत्तम प्रकारे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे यंदा सर्वत्र शेतक:यांना कांद्याचे उत्पादन चांगले आले आहेत. कांदा लावणीपासून ते कांदा चाळीत भरेर्पयत मोठय़ा प्रमाणात खर्चाला शेतक:यांना सामारे जावे लागते. मात्र गेल्या तीन वर्षापासून कांद्याचे भाव  उतरल्याने शेतक:यांना खर्च निघणे अवघड झाले आहे. एकरी 45 हजार रुपये र्पयत खर्च व मजुरी शेतक:यांना द्यावी लागत आहे. त्यातुलनेत कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
कांदा विक्रीसाठी येताहेत 170 वाहने 
पिंपळनेरसह परिसरात मोठय़ा प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे. यातूनच कांद्याचे उत्पादन घेतले गेले. परिणामी, येथील उपबाजार समितीत कांदा विक्रीसाठी  दररोज 150 ते 170 वाहने कांदा विक्रीसाठी आणले जात आहे. परंतु, भावच नसल्याने येथे आणलेली वाहने शेतक:यांना पुन्हा परत न्यावी लागत आहे. भाविष्यात कांद्याला चांगले भाव मिळतील, या हेतूने शेतकरी कांदा चाळीत साठवताना दिसत आहेत.
निजामपूर, जैताणे व दहिवेल येथे मार्केट
दरम्यान, कांद्याला योग्य हमी पिंपळनेर येथील उपबाजार समितीत मिळत नसताना शेतक:यांना दिलासा देण्यासाठी साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीने निजामपूर, जैताणे व दहिवेल येथे 2 मे पासून कांदा मार्केट सुरू होणार असून या मार्केटमध्ये शेतक:यांना अपेक्षित असलेला भाव मिळू शकतो, अशी आशा शेतक:यांमधून व्यक्त केली जात आहे.
यंदाही कांद्याला भाव नसल्याने कांदा चाळीत ठेवण्याची वेळ आली आहे. शासनाने शेतक:यांच्या या समस्येवर लक्ष द्यावे, अशी मागणी संजय भदाणे, अमोल गांगुर्डे, किरण कोठावदे या कांदा उत्पादक तसेच व्यापा:यांनी केली आहे.

Web Title: In Dhule district there is no price for onions, because of storage it is tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.